https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांचे राज्यस्तरीय सुयश

नांदेड:(दि.४ ऑक्टोबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांनी महाराष्ट्र राज्य वेटेरेन्स ऍक्युटिक असोसिएशनतर्फे कोल्हापूर येथे आयोजित २४ व्या राज्यस्तरीय मास्टर्स चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत दोन रौप्य व एक कास्य पदक प्राप्त केले आहे.
या राज्यस्तरीय सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व भविष्यातील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका व इंग्रजी विभागप्रमुख डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव यांची उपस्थिती होती.
प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना फ्री स्टाइल रिले फोर बाय पन्नास मीटर्स व पन्नास मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत द्वितीय रौप्य पदक तसेच शंभर मीटर बॅक स्ट्रोक स्पर्धेत तृतीय कांस्य पदक प्राप्त झाले आहे.
या सुयशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील,डॉ. श्रीरंग बोडके, डॉ.अजय गव्हाणे आदींनी अभिनंदन केले आहे.
———————————————

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704