https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात “स्वच्छता हीच सेवा” अभियान नांदुसा येथे संपन्न

*
नांदेड – ता. प्रतिनिधी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात स्वच्छता हीच सेवा अभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे संपूर्ण गावात ग्रामपंचायत कार्यालय तसेच जिल्हा परिषद शाळा व गावातील प्रमुख प्रार्थना स्थळे चौक आणि प्रत्येक रस्त्यांवर केरकचरा उचलत सरपंच सौ. पूजा राजू उर्फ तुकाराम जनकवाडे व समस्त ग्रामस्थांनी “एक साथ एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान” या शासनाच्या उपक्रमात सहभाग दर्शवून सर्व परिसर साफ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक संजय कोठाळे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत पंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सहकारी सोसायटीचे चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी याबरोबरच गावातील समस्त महिला तसेच पुरुष यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला व यापुढे संपूर्ण गाव स्वच्छ ठेवण्याचा वसा घेतला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704