https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘मध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

नांदेड:(दि.३० ऑक्टोबर २०२३)
राष्ट्रीय सहकारी विकास निगम क्षेत्रीय निदेशालय, पुणे व यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) यावर तीन दिवसीय जागरूकता सहप्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, या प्रसंगी राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे उप-संचालक श्री.शार्दूल जाधव, सहायक निबंधक श्री.योगेश भाकरे तसेच उप-प्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय ननवरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक श्री.शार्दूल जाधव यांनी प्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.गणेशचंद्र शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप करताना, मत्स्य पालन व्यवसायातील विविध संधीचा आढावा घेतला. त्याचबरोबर मत्स्य पालन व्यवसायाच्या आर्थिक विकासामधील महत्व यावर विवेचन केले.
सहायक निबंधक श्री.योगेश भाकरे यांनी, प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाचे महत्व व सहकार क्षेत्रातील विविध योजना यावर प्रकाश टाकला. यानंतर उप-प्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे यांनी मत्स्य पालन व्यवसायाच्या अकाउंटिंगबद्दल प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना पहिल्या दिवशी ‘बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अंड जनरल अकाउंटिंग प्रॅक्टिस’ या विषयावर वाणिज्य विभागप्रमुख डॉ.एच.एस.पतंगे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. आर.एल.सोनटक्के यांनी ‘प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स’ त्याचबरोबर श्री. विनायक कुंभार यांनी, फिशरी फार्मिंग या विषयावर प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटच्या व तिसऱ्या दिवशी डॉ.मोहोम्मद आमेर यांनी ‘टॅक्सेशन अँड जीएसटी’ तसेच प्रा.भारती सुवर्णकर यांनी ‘ऑडिट अँड ऑडिट कंपलाईन्सेस’ या विषयावर प्रशिक्षणार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी एन.सी.डी.सी.द्वारे महाविद्यालयाचे विशेष आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारती सुवर्णकार यांनी केले तर श्री. नितीन शिंगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे,प्रबंधक संदीप पाटील, डॉ.मोहम्मद आमेर, प्रा. सोनटक्के, प्रा.दुधाटे तसेच कार्यालय अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704