https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ओशो सम्यक ध्यान केंद्राला डाॅ. विजय तोष्णीवाल, एड् सतिषभाई बारहात्ते यांच्या कडून साऊंड सिस्टिम भेट.

मानवत / प्रतिनिधी.
आज दिनांक 03-08-2023 रोजी मानवत शहरातील प्रसिध्द वैद्यकीय व्यावसायीक डॉ विजयकुमार तोष्णीवाल व प्रसिध्द विधिज्ञ ऍड. सतीष भाई बारहाते यांच्या वतीने ओशो सम्यक ध्यान केंद्र मानवत यांना आहुजा कंपनीची ब्लु टूथ साऊंड सिस्टिम सप्रेम भेट देण्यात आली.
या साऊंड सिस्टिममुळे ध्यान केंद्रात आणखी एक सुविधा निर्माण झाली आहे. ध्यान केंद्राच्या वतीने इतरत्र ही ध्यान कार्यक्रम घेण्यासाठी यामुळे सोय होणार आहे . या वेळी ओ शो सम्यक ध्यान केंद्राचे केंद्रसंचालक प्रा. अरविंद घारे यांनी आदरनिय श्री, डाॅ. तोष्णीवाल, व प्रसिध्द विधिज्ञ एड् सतिषभाई बारहाते यांनी केंद्रास साऊंड सिस्टिम भेट दिल्या बद्दल केंद्र संचालक यांनी आभार व्यक्त केले
साऊंड सिस्टिम अर्पण सोहळ्याच्या वेळी मानवत शहरातील प्रसिध्द वैद्यकिय व्यावसायीक डॉ. विजयकुमार तोष्णीवाल व प्रसिध्द विधिज्ञ ऍड सतीश बारहाते यांचा सत्कार ध्यान केंद्राचे संचालक प्रा अरविंद घारे यांच्या हस्ते या वेळी करण्यात आला.
यावेळी ऍड डी.डी. मगर , प्रकाश करपे , प्रवीण कहेकर ,बापू कुटे विनोद केरे आदींची या वेळी प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमानंतर लाफ्टर , व डान्स सेलेब्रेशन आणि ओशो प्रवचन हे कार्यक्रम घेण्यात आले.
या वेळी सर्वानी कार्यक्रमाचा आनंद घेतला

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704