ताज्या घडामोडी

हिंदू माय भगिनीचे कुंकू पुसणाऱ्यांना ऑपरेशन शिदूंरच्या नावाखाली मोदीजी ने कडक पाऊल उचलून आंतकवाद्याचे अड्डे उध्वस्त केले….ना.मेघनाताई साकोरे, बोर्डिकर.

*मानवत/प्रतिनिधी*
—————*———————
भारतीय जनता पार्टी हा पक्ष हिंदुत्वाचा रक्षणासाठी व माय भगिनींच्या रक्षणासाठी सदैव पुढाकार घेणारा पक्ष आहे‌. कश्मीर मधील पहलगाव येथे निपराध हिंदू माय भगिनींचे कुंकू पुसून त्यांना विधवा करणाऱ्या आंतकवाद्यांना योग्य धडा शिकवण्यासाठी आंतकवाद्यांना मदत करणाऱ्याच्या घरात घुसून त्यांचे अड्डे उध्वस्त केले. असे विचार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर यांनी येथील रेणुका मंगल कार्यालयामध्ये मानवत तालुका भाजपाच्या वतीने नागरी सत्कार, व संघटनात्मक बैठकीचे आयोजन तसेच नागरिकांसाठी सुसंवाद साघणे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री सौ.मेघनाताई बोर्डीकर यांनी आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हणाल्या. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली उचललेल्या पाऊलांचे साऱ्या जगाने व साऱ्या देशांनी कौतुक करुन स्वागत केले. परंतु काही विरोधीना हे पचले नसल्याने त्यांनी विरोधाची भाषा वापरून एक प्रकारे देश विरोधी कार्यास पाठिंबा दिला आहे. जिंतूर व सेलू शहरातील तसेच जिंतूर व सेलू तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी मला दोन वेळा आमदार पदी विराजमान करून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला त्यांचे मी आभार व्यक्त करते. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला जाणार नाही. या मतदार बंधू-भगिनीचे मी सदैव ऋणी राहील. भारतीय जनता पार्टी हा देशाचे राज्याचे व कुटुंबाचे रक्षण करणारा व विकास करणारा राष्ट्रीय पक्ष आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी साऱ्या जगाला व साऱ्या देशाला अभिमान वाटावे असे कार्य सिंदूर ऑपरेशनच्या नावाखाली उचललेल्या कडक पावलाचे जगातील सर्व देशांनी व भारतीयांनी कौतुक करून त्यांचे स्वागत केले. मोदीजी यांनी रोटी कपडा मकान गोरगरिबांना देऊन त्यांना मोफत धान्य वाटप तसेच प्रत्येकांच्या घरात वीज पाठवून. आरोग्याची विशेष काळजी घेऊन विविध योजना त्याचबरोबर माय भगिनींसाठी विविध योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी व उद्योजकांच्या हितासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल होय. परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने विविध विकास योजनांचा मी लाभ घेऊन परभणी जिल्ह्याचा विकास करणार. शेतकऱ्यांसाठी मग तो पिक विमा योजना असो किंवा अनेक विविध योजनाचा मी लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणार. आज आपला भारत देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली अग्रेसर आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली अग्रेसर आहे. आपल्या परभणी जिल्ह्याचा विकास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो. त्यांच्या नेतृत्वाखाली मी परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहील.
कश्मीर मधील पहेलगाम येथील निपराघ हिंदू माय भगिनींचे कुंकू पुसून त्यांना विधवा करणाऱ्या अंतक वाद्यांना योग्य शासन व्हावे या हेतूने नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली आंतरकवाद्यांना मदत करणाऱ्यांच्या घरात घुसून अंतक वाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. मोदीजींनी उचललेल्या पावलाचे व योग्य निर्णयाचे साऱ्या जगातील देशाने व सर्व भारतीयांनी कौतुक करून या निर्णयाचे स्वागत केले. सर्व भारतवासीयांना आपल्या सैनिकांचे व नरेंद्र मोदींचे फार मोठे अभिमान आहे.
भारतीय सैनिकांनी केलेल्या कार्याचे पराक्रम साऱ्या जगाने पाहिले . हे आजचे आधुनिक भारत आहे. आजचे आधुनिक भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे अग्रेसर होत आहे. भारत वाशियांचे मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हा असून महाराष्ट्र हा कापूस पिकवणारा देशातील सर्वात मोठा प्रमुख राज्य आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शेती विषयक योजनाचा मी पुरेपुर लाभ घेऊन त्यांचे हित साधणार. राज्यात आगामी होणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत, भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी न घाबरता या संस्थावर भाजपचा भगवा फडकण्यासाठी पुढे यावे मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या निवडणुकीमध्ये कोणाचेही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. असे विचार महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनाताई बोर्डीकर यांनी येथील रेणुका मंगल कार्यालयामध्ये मानवत तालुका व मानवत शहर भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार मेळाव्यात प्रमुख म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले.*(( ०२ ))*

यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव प्राचार्य अनंत गोलाईत यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राध्यापक डाॅ. शिवराज नाईक यांनी केले. यावेळी मेळाव्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते त्याच बरोबर मानवत शहरातील विविध समाजाच्या महिला मंडळ, यामध्ये राजस्थानी महिला मंडळ वाणी समाज महिला मंडळ क्षत्रिय समाज मंडळ आर्य वैश्य महिला मंडळ सुवर्णकार समाज महिला मंडळ व इतर महिला मंडळांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली या महिला मंडळाच्या वतीने मेघना दीदी यांना वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आले. मानवत येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या संचालिकाच्या वतीने ही वृक्षाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आले. प्रारंभी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतानां श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाता मुळे सत्कार हार तुरे स्वीकारले गेले नाहीत.
या मेळाव्यात मानवत शहर व मानवत तालुक्यातील असंख्य शिवसैनिक , काँग्रेसचे पदाधिकारी विविध ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य यांनी सो. मेघना दीदीच्या उपस्थित भाजपा मध्ये प्रवेश केला. भाजपा मध्ये प्रवेश करणाऱ्यांना सौ. मेघनाताई दीदी यांच्या हस्ते भा.ज.पा.चे रुमाल घालून स्वागत व सत्कार करण्यात आले.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.