गडचिरोली,प्रतिनिधी :-
ग्राहकांच्या न्याय्यहक्कांसाठी लढणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची गडचिरोली नुकतीच गठीत करण्यात आली. स्थानिक सिटी हार्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट येथे झालेल्या सभेत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
या सभेला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सहसचिव जयंतीभाई कथेरिया व विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

गडचिरोली कार्यकारिणीच्या मार्गदर्शकपदी प्रकाश पाठक, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश त्रिनगरीवार, जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी कोंडावार, जिल्हा सचिव उदय धकाते, जिल्हा सहसचिव मिलिंद उमरे, जिल्हा सहसचिव डॉ. महेश जोशी, जिल्हा संघटनमंत्री विजय कोतपल्लीवार, जिल्हा सहसंघटनमंत्री शेमदेव चाफले, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष धंदरे, कोषाध्यक्ष नितीन भडांगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नीलेश पटले, जिल्हा महिला प्रमुख अंजली कुळमेथे, जिल्हा सह महिला प्रमुख जिल्हा विधी सल्लागार अॅड. नीलकंठ भांडेकर, जिल्हा विधी सल्लागार अॅड. प्रमोद बोरावार, जिल्हा कार्यकारिणी सदस्यांमध्ये प्रशांत भृगवार, नरेश सोनटक्के, उदय बोरावार, विलास भृगुवार, गीता कस्तुरे यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोलीच्या कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.