https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “कप बशी “:लैलेशा भुरे

              कप आणि बशी
**************************
एकत्र काम करणारी दोन माणसे असोत की जनावरे, कधीतरी वाद – भांडण होणारच. यालाच तर भांड्याला भांडे लागणे म्हणतात आणि कप बशी हे तर सतत जोडीने बऱ्याचवेळा गोडी गोडीने वावरतात(राहतात) अर्थात कधीतरी कपाला बशी(भांड्याला भांडे) लागणारच ना ? अगदी तसेच झाले.

जो तो बशीतील कप उचलून ओठाला लावतो ते पाहून कप बशीला खिजवत म्हणाला,”बशी ए बशी, तू माझ्यासोबत असतेस म्हणून तुला लोक हातात घेतात. तू एकटी असशील तर तुला कुणी विचारणार नाही हे लक्षात ठेव.” हे ऐकून बशी कशी गप्प बसेल ? ती लगेच उत्तरली, “हे बघ कपा, उगी बोलू नको बका…… बका. तुझ्या सोबत मी असते म्हणून लोक आदराने दोन हाताने उचलून प्रेमाने ओठाला लावतात नाहीतर तुला…. मी नसेन तर सरळ तुझा कान पकडून उचलतात. कान कुणाचा पकडतात, माहित आहे ना ?” त्यावर कप उत्तरला, “अगं बाई, तुझ्या अंगाला चटके बसू नये म्हणून उकळत्या चहाचे चटके मी सोसतो आणि लोकांना मला सहज उचलून घेता यावे म्हणून मी स्वत: माझा कान आनंदाने लोकांच्या हाती देतो हे समजून घे. लोक शिक्षा देण्यासाठी माझा कान नाही पकडत.” “ते मला सांगू नको, ज्याला त्याला मान – पान, काम – धाम त्याच्या योग्यतेप्रमाणे मिळते त्यामुळे तू उकळत्या चहाचे चटके सहन करतो, लोक तुझा कान पकडून उचलतात याची कारणे मला सांगू नको.” अशी बशी म्हणताच कपाने थोडा विचार केला व म्हणाला, “तुझा असा तोरा बघून तर लोक हल्ली तुला टाळतात. त्यांना माहित आहे, चहा – कॉफी प्यायला बशीची तशी गरज नाही पण कप मात्र हवाच तेव्हा यातून बोध घे नि अंगी नम्रता बाणवं.” आता बशी काही बोलणार तितक्यात त्या घरातील गृहीणीने आपल्या कामवाली बाईला आजोबांना चहा द्यायला सांगितला आणि आठवणीने कपाबरोबर बशीही दे असे सांगितले तर तीने आपल्या बाळासाठी कपात घेतलेले दूध बशीत ओतून बाळाच्या नाजुक ओठांना बशी लावली ते पाहून बशी खूश झाली आणि ती काही बोलणार तितक्यात कप म्हणाला, “समजले बरे तुझे महत्व. पण माझ्याशिवाय तुझे अस्तित्व नाही हे लक्षात ठेव. माणसे जर आपल्याला एकत्र ठेवतात, एकत्र नाव घेतात तर आपण का भांडायचे माणसांसारखे ?” बशीला कपाचे म्हणणे पटले आणि दोघांचे भांडण मिटले.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704