ताज्या घडामोडी

बैलगाडीवरून शिक्षणाची गंगा – विद्यार्थ्यांच्या दारी स्वागतासाठी शिक्षकानेच साकारली बळीराजाची वेशभूषा

प्रतिनिधी: (राज गायकवाड)
दिनांक २३ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे शाळा प्रवेशोत्सव दिन अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा प्रवेशोत्सव दिनानिमित्त शाळेच्या गेट समोर सुंदर अशी स्वागत रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थी आल्यावर वर्ग पहिली मध्ये झालेले नवीन प्रवेश नवागत विद्यार्थ्यांचे सुंदर अशा सजलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी मध्ये शाळेतील शिक्षक अमोल पाईकराव सर यांनी बळीराजाची भूमिका साकारली होती. ही शैक्षणिक गुणवत्तेची बैलगाडी शाळेपासून निघाली तेव्हा गावातील असंख्य नागरिकांनी नवागत बालकावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.ही शैक्षणिक गुणवत्तेची बैलगाडी घरोघरी पोहोचली. बैलगाडीच्या समोर विद्यार्थ्याचे लेझीम पथक, ढोल पथक, विद्यार्थ्यांनी हातात धरलेले बॅनर होते. बैलगाडीच्या पाठीमागे शाळेतील सर्व विद्यार्थी आणि असंख्य मंडळी चालत होती.चौका चौकामध्ये बळीराजाची भूमिका साकारलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन केले. आणि सर्व बालकांनी शाळेत प्रवेश करावा ही विनंती केली. यावेळी नवागत बालके अतिशय नटून थटून डोक्यात छान अशी टोपी घालून बैलगाडी मध्ये बसून आनंदित झाले होते. गावातून सर्वत्र फिरून आल्यावर परत ही शैक्षणिक गुणवत्तेची बैलगाडी शाळेच्या गेटपाशी येऊन थांबली. सर्व नवागत विद्यार्थी बैलगाडीतून उतरले. शाळेच्या गेटपाशीच सर्व नवागत बालकांचे शाळेतील मॅडमनी त्यांचे औक्षण करून त्यांच्या हातात गुलाबाचे फुल दिले. सर्व नवागत बालके शाळेच्या स्टेज जवळ पोहोचले. तिथे गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा ग्रुप फोटो घेण्यात आला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची सेल्फी पॉईंट जवळ सेल्फी घेण्यात आली. तिथून त्यांच्या वर्गात जाण्यासाठी छान रांगोळी आणि त्यावर फुले अच्छादली होती. वर्गाच्या पायरीपाशी गेल्यानंतर सर्व नवागत बालकांच्या हाताच्या आणि पायाची ठसे छान अशा लाल रंगात कोऱ्या कागदावर घेण्यात आले. वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. त्यानंतर पुस्तके वाटप करण्यात आली.
अतिशय विलोभनीय असा शाळा प्रवेशोत्सवाचा मोठ्या आनंदात थाटामाटात संपन्न झाला.
*या कार्यक्रमाला गावातील सरपंच उपसरपंच तथा सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यालय साखरा, अध्यक्ष उपाध्यक्ष तथा सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती साखरा तसेच गावातील नवयुवक तरुण मंडळींनी, महिला मंडळींनी आणि समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले. समस्त साखरा गाववास्याचे अगदी मनापासून आभार.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.