विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केल्यास यश प्राप्त होते – प्राचार्य डॉ.सुधीर जगताप

————————————-
उदगीर :- आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही. दररोज नियमित अभ्यास करून ज्ञान प्राप्त केल्यास यश निश्चित प्राप्त होते.त्यासाठी प्रत्येकानी आपल्या जडण-घडणी कडे लक्ष दिले पाहिजे. काय चांगले आहे ते स्वीकारायचे आणि जे वाईट असते ते नाकारायचे यांची जाणीव विद्यार्थ्यानी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होई पर्यंत आणि पुढे आयुष्यात सतत लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तरच आपण ठरवलेले उद्दिष्ट गाठू शकतो असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी आपल्या मनोगतात केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीचा स्वागत व परिचय कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जय – हिंद पब्लीक स्कूलचे प्राचार्या डॉ. कृष्णा कथुरिया, स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेजचे प्राचार्य गणेश तोलसरवाड,स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे,स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, संस्थेच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख स्नेहा लांडगे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, संगणकशास्त्र विभागाचे प्रभारी प्रा. राशेद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, विद्यार्थ्यानी आपल्या शैक्षणीक काळात अपयशामुळे खचून न जाता आपल्या मधील कोणते सामर्थ्य आहे ते ओळखून त्याप्रमाणे आपली कृती केली पाहिजे. स्वतःचे चारित्र्य, नीतिमूल्ये आणि आत्मविश्वास जपला पाहिजे.विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आल्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणतेही अकृत्य करण्याऐवजी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे कारण गुणवत्ता व यश संपादित करण्यासाठी सतत परिश्रम करणे गरजेचे असते. अभी नहीं तो कभी नहीं या प्रमाणे आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास केल्यास नक्कीच तुमचे जीवन सफल होईल.असे ही ते म्हणाले.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची तसेच विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबतची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता कुलकर्णी व प्रा. सायमा पटेल यांनी तर आभार प्रा. पूजा माने नी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. आसिफ दायमी, प्रा. उस्ताद मोहम्मद, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. नावेद मणियार, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. रोशनी वाघमारे, प्रा. शीतल तोगरीकर, प्रा. सचिन तोगरीकर, प्रा.अंजली रविकुमार, काजल सांगवे, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, बायडी वाघमारे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.