नवीन शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेत रोजगाराच्या अनेक संधी –डॉ.जहीरुद्दीन पठाण

नांदेड:(दि.१० ऑगस्ट २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने इंग्रजी भाषा प्रयोगशाळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार व हिंदी विभागप्रमुख डॉ.संदीप पाईकराव यांच्या सहकार्याने नवीन शैक्षणिक धोरण-२०२० अंतर्गत अभ्यासक्रम चर्चा व सत्र प्रारंभ समारंभ आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय,उमरी येथील हिंदी विभाग प्रमुख प्रो.डॉ.जहीरुद्दीन पठाण उपस्थित होते.
‘नवीन शैक्षणिक धोरण आणि हिंदीतील रोजगार संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करताना त्यांनी, शिक्षण,तंत्रज्ञान,अनुवाद, सर्जनशील कार्य, मनोरंजन, संवाद लेखन, गीत लेखन अशा अनेक क्षेत्रातील रोजगार व संधींची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी, नव्या भारताच्या नव्या अपेक्षा आणि नव्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे एक सशक्त माध्यम असल्याचे म्हटले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील जाधव यांनी केले तर डॉ. साईनाथ शाहू यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.विद्या सावते यांच्यासह कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आणि डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.