भगवान रजनीश एक दिवसीय ध्यान शिबीर उत्साहात संपन्न*

*
नांदेड:( दि.१५ जून २०२५)
भगवान रजनीश ब्लेसिंग्स् मेडिटेशन इंटरनॅशनल कम्युन येथे एक दिवशीय ध्यान शिबिर दि.१५ जून रविवार रोजी उत्साहात संपन्न झाले.
भगवान रजनीशद्वारे संन्यासीत स्वामी गोपाळ भारती यांच्या मार्गदर्शनानुसार आणि स्वामी प्रेम प्रशांत आणि मा प्रेम सुगंध यांच्या नियोजनानुसार तुलसी पेंट्स आणि कम्फर्टचे ओनर स्वामी आनंद सुरेश उर्फ सुरेश धूत यांच्या संचालनाखाली ध्यान शिबिर विविध ध्यान प्रयोगांनी संपन्न झाले.
यावेळी नृत्य ध्यान, स्टॉप मेडिटेशन, सायलेंट मेडिटेशन, लिसनिंग मेडिटेशन, लाओ त्से यांच्याद्वारे निर्मित नाभि केंद्र ध्यान आणि संपूर्ण शरीराद्वारे श्वासोश्वास ध्यान साधकांनी केले तसेच समारोप प्रसंगी उत्सव साजरा करण्यात आला.
या ध्यान शिबिरात प्रा. महेंद्र देशमुख, सौ.संगीता देशमुख, डॉ.अजय गव्हाणे, पांडुरंग वडगावकर, सरोज पनाड आदी भगवान रजनीश संन्यासी, साधक आणि प्रेमींनी सहभाग घेतला.