यशवंत ‘ मधील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना सिल्वर मेडल

नांदेड:(दि.१६ जून २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांना स्विमिंग वेल्फेअर असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर तर्फे एमजीएम स्पोर्ट्स क्लब आणि स्टेडियम येथे दि.१४ जून रोजी आयोजित वर्षा मंगल जलतरण स्पर्धा:२०२५ मध्ये ५० मीटर फ्री स्टाइल स्पर्धेत सिल्वर मेडल प्राप्त झाले आहे.
या सुयशाबद्दल माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी यथोचित सत्कार केला आणि भावी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. एस.एस. बोडके, डॉ.विश्वाधार देशमुख, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा.नरेंद्र कंचटवार, डॉ. एकनाथ मिरकुटे, प्रा. सचिन अपस्तंभ, डॉ. मुकेश धर्मले, प्रा. सचिन महिंद्रकर, डॉ.बी. जी. देशमुख, प्रा.एस.एम. कुलकर्णी, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. गोपाळराव गुंजकर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री.किशोर गुंजकर आणि श्रीकांत गुंजकर यांनी देखील प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.