ताज्या घडामोडी

के.के.एम. महाविद्यालयाच्या वतीने राजश्री मुंडे हिचा सत्कार

मानवत / प्रतिनिधी.

येथील राजश्री भास्करराव मुंडे यांना पीएचडी मिळाल्याबद्दल के. के.एम. महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
शनिवार दिनांक 23 मे रोजी येथील के. के.एम. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात *पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे* अध्यक्ष विजयकुमारजी कत्रूवार यांच्या श्रीहस्ते सत्कार संपन्न झाला.
राजश्री मुंडे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात संशोधन केले असून *”पंकजा गोपीनाथ मुंडे, राजकीय नेतृत्व: एक अभ्यास”* या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला.
देवगाव रंगारी येथील आसारामजी भांडवलदार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. मुंडे यांनी राज्यशास्त्र विषयात एम. फिल. पूर्ण केले असून सहा. प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षेमध्ये ही (सेट) यश संपादन केले आहे. यावेळी के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे , राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पंडित लांडगे, डॉ. एस. एन. चोबे, प्रा. शारदा कच्छवे, महेश मोकरे, रुपेश देशपांडे, प्रसाद जोशी यांची या वेळी उपस्थिती होती.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.