यशवंत’ ने जिंकला महाराष्ट्राचा महावक्ता चषक

नांदेड:( दि.२४ जानेवारी २०२५)
श्री.लाल बहादुर शास्त्री शिक्षण संस्था, उमरी संचलित श्री.शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोकरच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्राचा महावक्ता फिरता चषक प्रथम पुरस्कार यशवंत महाविद्यालयाचा वादविवाद संघ व्यंकटेश शिंदे व दत्ताहरी जाधव या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे.
यशवंत महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत या दोन वादविवादपटुंनी अत्यंत मोलाची भर टाकलेली आहे.
श्री.शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत ‘ईव्हीएममुळे
लोकशाही धोक्यात येत आहे किंवा नाही’ या विषयावर अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने आपले मत मांडत यशवंत महाविद्यालयाच्या या दोन विद्यार्थ्यांनी फिरता चषक पारितोषिक प्राप्त करून दिले आहे.
याशिवाय स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई येथे उत्तेजनार्थ पारितोषिक या विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे.
या सुयशाबद्दल माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी दोन्ही वादविवादपटूंचा यथोचित सत्कार करून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या विद्यार्थ्यांना समन्वयक मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप यांनी मार्गदर्शन केले आहे.
यशस्वीत्यांचे उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.