स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर या संस्थेच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय,नर्सिंग कॉलेज उदगीर, फ्लोरेन्स कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर, अध्यापक महाविद्यालय, जय हिंद पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज संयुक्त विद्यमाने व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, संस्थेचे एच.आर मॅनेजर अनिश जेट्टी, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, प्राचार्य डॉ.गोपाळ पवार, प्राचार्य गणेश तोलसरवाड, प्राचार्य संजय हट्टे, प्राचार्या ज्योती तारे, प्राचार्य नागसेन तारे, प्राचार्य मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव,पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, उपप्राचार्य सतीश वाघमारे, प्रा.रशीद दायमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, माता रमाबाई आंबेडकर ह्या त्यागाच्या प्रतिक आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य कष्टमय होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी त्या खंबीर पणे उभ्या राहिल्या आपले दुःख त्यांनी कधीच जाहीर न करता येणाऱ्या अडी अडचणीना त्या खंबीरपणे सामोऱ्या गेल्या. आजच्या तरूणाई साठी माता रमाबाई आंबेडकर यांचे जीवन व कार्य हे सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे. असे ही ते म्हणाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.आकाश कांबळे, प्रा.असिफ दायमी, प्रा.ऋतुजा डिग्रसकर, प्रा.राखी शिंदे, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा.अनुजा चव्हाण, प्रा. नम्रता कुलकर्णी, प्रा. रोहिणी रोडगे, प्रा. रोहिणी वाघमारे, उषा गायकवाड, सुमित शेल्हाले, सुयश स्वामी, अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, वैभव बिडवे, संदेश गवळे, सुरेश पवळे, महेश हुलसुरे यांनी परिश्रम घेतले.