ताज्या घडामोडी

करणी सेनेच्या वतीने *साई शटल* बस सेवा सूरू करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे मागणी

mcr.news / Manawat
———————————————

मानवत तालूका करणी सेनेच्या वतीने मानवतरोड रेल्वे स्टेशनवर साई शटल बस सेवा सुरु करण्याची मागणी एका निवेदना द्वारे करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, मानवत तालुक्यातील मानवतरोड हे रेल्वे स्थानकाचे गाव असुन मानवतरोड रेल्वे स्थानक (स्टेशन) हे सोनपेठ, पाथरी, मानवत या 3 तालुक्याच्या नागरीकांसाठी सोईचे असुन या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात मुंबई- हैद्राबाद याकडे रेल्वे धावतात. पाथरी शहर हे साईबाबांचे जन्मस्थळ असल्याने परराज्यातुन मोठ्या प्रमाणात भक्त वर्ग या स्टेशनवर उतरुन पाथरीला येतो. पण अनेक वेळा नागरीकांना वाहन मिळत नाही. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहनाचा आसरा घ्यावा लागतो, तर अनेक वेळा वाहन चालक मनमानी करतात त्यामुळे पाथरी आगारातुन (साई दर्शन) म्हणुन मानवतरोड रेल्वे प्रवाशांसाठी शटल बस सेवा सुरु करुन सामान्य नागरीकांच्या मागणीची पुर्तता करावी अशी मागणी करणी सेनेच्या वतीने करण्यांत आली असुन तात्काळ शटल बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा सामान्य जनतेच्या मागणीसाठी आंदोलन उभारावे लागेल आंदोलन काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आपले लोककल्याणकारी प्रशासन जबाबदार राहील. असा ईशारा करणी सेनेचे यूवा तालूका अध्यक्ष राम पंडीतराव दहे पाटील यांनी केले आहे.

..

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.