कोल्हा येथे डेंग्यू व चिकनगुनिया या रोगाबद्दल जनजागृती मोहीम

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोल्हा येथील आरोग्य कर्मचारी यांनी आज दिनांक 7- ऑगस्ट बुधवार रोजी संपूर्ण कोल्हा गावाचे सर्वेक्षण करून डेंग्यू चिकनगुनिया हिवताप हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत जनजागृती सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. सर्वेक्षण मोहीम आरोग्य सहाय्यक श्री नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ते यांनी मिळून केले यावेळी श्री वाघमारे आरोग्य सेवक सुभाष फुलवरे,श्री गजलकर, श्री काळे,श्री गोंधळ कर,आरोग्य सेविका श्रीमती सरोदे, आशा सुपरवायझर श्रीमती चौरे, श्रीमतीमीनाक्षी गोरे, आशा कार्यकर्ती अशामती तिडके, मीरा घागरे, वंदना भिसे, श्रीमती गायकवाड उपस्थित होत्या. प्रमोद तारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख पाथरी विधानसभा, परभणी यांची यावेळी गावामध्ये भेट घेतली. सर्वेक्षण करून पाणी स्वच्छता परिसर स्वच्छता आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे या कामी गावकऱ्यांनी चांगले सहकार्य केले.
**