https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

आनंद नगर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विदयार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शालेय गणवेश वाटप

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. किन्होळा बु. येथील आनंद नगर येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन अगदी उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी विदयार्थ्यांच्या वतीने सकाळी गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली व त्यानंतर शाळेत ध्वजारोहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन निवृत्ती कदम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय मुलांना मोफत गणवेश या योजनेतून विदयार्थ्यांना दुसरा गणवेश वाटप करण्यात आला.
विदयार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत शाळेत एक बोअरवेल तसेच सोलर पावर प्लांट, दोन हजार लिटर क्षमता असलेली टाकी असा पूर्ण संच शाळेत कार्यन्वित करण्यात आला.
या संचाचे उदघाटन किन्होळा बु. ग्राम पंचायचे सरपंच श्री. मदनराव चौधरी, उपसरपंच मदनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सय्यद, शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष नितीन निवृत्ती कदम, उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नागरिक श्री त्र्यंबकराव कदम यांच्या सह सन्माननिय ग्राम पंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापण समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704