https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

बळींचे राज्य हे महात्मा फुले यांचे स्वप्न होते- प्रा. डॉ. साईनाथ शेटोड

सोनखेड (वार्ताहार) दि.२६- बळीराजा हा ऐतिहासिक पुरुष होता की पौराणिक पुरुष होता, हे नक्की सांगता येत नसले तरी म. जोतीराव फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात ‘इडा पीडा टळो अन् बळीचे राज्य येवो’ अशी राजकीय इतिहासाची जी
पुनर्मांडणी केली होती. त्यातून म. फुले यांना या देशात बळी वंशजांचे राज्य पुनर्प्रस्थापित करावयाचे होते, असे प्रतिपादन डॉ. साईनाथ शेटोड यांनी केले. ते मौ. कलंबर (बु.) ता. लोहा येथे स्वा. रा. ती.म. विद्यापीठ, नांदेड व लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहिःशाल व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी माननीय मनुसिंह ठाकूर हे उपस्थित होते. प्रारंभी डॉक्टर आर डी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर मा. बाबूअण्णा गोरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून पुढील कार्यक्रमास परवानगी दिली. पुढे बोलताना डॉ. शेटोड म्हणाले की, शेती हा या देशातील मोठा उद्योग असला तरी राज्य आणि धर्मासंबंधीच्या अनेक कारणांमुळे तो परंपरेपासून तोट्यात आहे, हे ज्योतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहेच; त्याशिवाय हा उद्योग व्यवसाय लाभदायी कसा होईल यासंबंधीच्या अनेक शास्त्रीय उपाययोजनाही सांगितल्या आहेत. परंतु आपल्या देशातील शेतकऱ्यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ कधी वाचलाच नाही. त्यामुळे परंपरेपासून चालत आलेले प्रश्न आजही तसेच कायम आहेत. शेतकऱ्यांचा क्रांतीवाद या देशात यशस्वी करावयाचा असेल तर सर्वप्रथम शेतकरी वर्गाने आपापसांतील जात आणि धर्मभेद बाजूला सारून म. फुले यांनी पाहिलेले बळी राज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघटित झाले पाहिजे तरच शेतकऱ्यांचा उद्धार शक्य आहे, असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कांबळे डी. आर. यांनी तर आभार विवेक तेलंग यांनी मानले.
यावेळी बळीराम भोकरे, मोहन गाजेवार, श्रीधर गोरे, बालाजी संगेवार, बापूराव मुक्कनवार, भैयालाल मंडले, शंकर भूतापले, बुद्धभूषण गायकवाड आदी मान्यवर तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704