https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात उन्हाळी वासंतीक शिबिर समारोप कार्यक्रम संपन्न

.

——————————

*मानवत:-प्रतिनिधी.*

*मानवत येथील सौ.रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व गीता परिवाराच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान वासंतीक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विविध संस्कारमय उपक्रम कलाकृती घेण्यात आल्या वासंतीक शिबिर प्रमुख तथा वर्कआउट प्रमुख श्रीमती दीपा भावसार यांनी योगासनाचे धडे दिले, त्या बरोबरच गीता परिवाराचे मराठवाडा सचिव तथा मानवत तालुका अध्यक्षा श्रीमती संगीता तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलाकृती स्पर्धा, संस्कार क्षम व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी गीता परिवार सदस्य श्रीमती प्रीती लड्डा,श्रीमती सुजाता बांगड, श्रीमती साची मंत्री, श्रीमती अरुणा चांडक, श्रीमती राणी चांडक, श्रीमती सिद्धी मंत्री, श्रीमती शितल मंत्री , श्री विनायक कुलकर्णी , उपक्रमशील शिक्षक श्री विशाल घाटूळ ,कु.जानकी लड्डा यांनी व्यक्तिमत्व विकास घडविणारे उपक्रम घेतले. यामधून विविध अशा स्पर्धा आणि उपक्रमामध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभ 30 एप्रिल रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक व्ही.एल शिंदे, यांच्या उपस्थितीत पार पडला. यशस्वीताना वासंतीक शिबिर प्रमाणपत्र, व पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांना यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गीता परिवाराचे सदस्य या वेळी उपस्थित होते.*

—————————————————————-
.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704