https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालया अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम करून वेतन श्रेणी लागु करा , कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

महाराष्ट्रात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सन २००५ पासून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मॉडेल ३ होण्याचा प्रयत्नात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे.
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आदर्श शाळा असून आय. एस. ओ. मानांकन प्राप्त आहे सदरील शाळेचा निकाल उत्तम प्रकारे असून अनेक विद्यार्थी या शाळेतून घडले आहेत. शाळेत एकल पालक, अनाथ, गरीब, दारिद्र्य रेषेखालील तसेच शाळा बाह्य ऊसतोड कामगारांच्या मुली या शाळेत शिक्षण घेत असून त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे त्यामुळे शाळेतील गेली सतरा वर्षां पासून जे कर्मचारी अल्पशा मानधनावर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना कायम करून शासन सेवेत सामावून घ्यावे व वेतन श्रेणी लागु करावी अशी मागणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कार्यरत असणाऱ्या शिक्षक व कर्मचारी यांनी संबंधित जिल्हा प्रशासन तसेच सर्व लोक प्रतिनिधी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी मैथिली जोशी, गृहपाल अंजलीताई पुरी, सपनाताई राऊत, शिक्षिका स्मिताताई पाटील, संजय डोईफोडे यांच्या सह कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704