https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सौ कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

नांदेड:- शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड अंतर्गत असणाऱ्या सौ कुसुमताई शंकरराव चव्हाण यशवंत महाविद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड ची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ संभाजी वर्ताळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

याप्रसंगी पतसंस्थेचे सचिव प्रा.डॉ.ए टी शिंदे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अच्युत सावळे व संचालक, कोषाध्यक्ष के टी तेलंग , संचालक प्रा.डॉ.एल टी काळे,आर जी जाधव, डॉ मधुकर बोरसे,प्रा डॉ आर जी पवळे,शेख जाकेर शेख गौस, किरण तांदळे , प्रा डॉ एस जी घुगे, प्रकाश शिंदे, राजाराम बुरकुले हे सन्माननीय संचालक सभेसाठी उपस्थित होते प्रारंभी सौ कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व संचालक मंडळांनी अभिवादन केले.
पतसंस्थेचे सचिव प्रा डॉ ए टी शिंदे यांनी पतसंस्थेच्या 48 व्या वार्षिक अहवालाचे वाचन केले या प्रसंगी पतसंस्थेचे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेस काही महत्त्वाच्या सूचना करून त्याचे अनुकरण करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन दुरुस्ती करावी असे सुचविले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ संभाजी वर्ताळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सभासदांनी सुचविलेल्या सूचनेचे स्वागत केले येणाऱ्या काळामध्ये आपल्या सूचनेचे अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले या वार्षिक सभेत अनेक सभासदांनी सहभाग घेऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रात यशवंत महाविद्यालय वरिष्ठ नांदेड, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, यशवंत महाविद्यालय व्होकेशनल विभाग ,नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड, नांदेड फार्मसी कॉलेज, मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालय, इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको नांदेड, अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय हे कार्यरत आहेत. या पतसंस्थेत सक्रिय सभासद 289 आहेत. आणि सर्व सर्व सभासदांनी स्नेहभोजनाच्या आस्वाद घेतला या वार्षिक सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा डॉ ए टी शिंदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक प्रा डॉ एल टी काळे यांनी केले वार्षिक सभेच्या यशस्वीतेसाठी देविदास पवार, साईनाथ पवार, विष्णुकांत जोगदंड यांनी परिश्रम केले

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704