https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

ग्राहक दिन साजरा करण्यासाठी जनजागर मोहिमेचे आयोजन करा भास्करराव कदम यांची तहसिल प्रशासनाकडे निवेदनाद्बारे मागणी

मानवत / प्रतिनिधी.

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यात राष्ट्रीय ग्राहक दिन जागरण पंधरवडा म्हणून साजरा करणे बाबत. वरिल विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ डिसेंबर २०२३ या ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक जागरण पंधरवडा १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान साजरा करण्यात यावा. या साठी संबंधीत यंत्रणेला सुचना देण्यात याव्यात.
ग्राहक दिन साजरा करण्याच्या संबंधाने केलेल्या नियोजनात शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना ग्राहकांना आवश्यक असलेली सर्व माहिती या गोष्टीचा समावेश असावा यासाठी कॉलेज, शाळा, वस्त्या ग्रामिण भागातील छोटी मोठी खेडी अशा सर्व ठिकाणी ग्राहक जागरणाचे कार्य करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे, यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तसेच ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांना सोबत घेवून पथनाटय, निबंधस्पर्धा, महिला मंडळ, विविध स्पर्धा, शेतकरी मेळावे अशा उपक्रमाव्दारे व्यापक जनसंपर्क करुन ग्राहक जागरणाचे कार्य करण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
ग्राहक जागरण पंधरवाडयामध्ये नव्याने आलेला ग्राहक संरक्षण कायदा अन्नसुरक्षेच्या बाबतीत विविध माहिती ग्राहकांना पुरवणे, नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाचा ग्राहकांच्या आवडीची झालेली ऑनलाईन खरेदी व त्यातील फसवणूकीपासून कसे सावध रहावे संबंधीची माहिती दैनंदिन जीवनात उदभणाऱ्या खरेदी संबंधी विविध कायदयाची माहित वैधमापणशास्त्र संबंधीच्या मुलभूत अधिकाराची माहिती इत्यादी बाबींचा जागर उपक्रमामध्ये समावेश असावा या प्रमाणे तालुक्यात ग्राहक दिन जागरण पंधरवाडा साज करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे हि विनंती.
भास्कर उध्दवराव कदम
जिल्हा ग्राहक संरक्षण परीषद परभणी सदस्य
अशोकराव कदम आसाराम तुकाराम नानेकर गुलाबराव काळे गोविंद दहे मिरा वानखेडे, भरतराव कदम डिगांबर लोखंडे भास्करराव कदम यांची मागणी.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704