https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सर्वोत्तम प्रशासनासाठी आधुनिकता संवेदनशीलता व तत्परता आवश्यक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

६ अनुकंपधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती आदेउत्कृष्ट कार्याबद्दल कोतवालांपासून अधिकाऱ्यांना पुरस्कार बहाल

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्हा प्रशासनाच्या लोकाभिमुख सेवेचा मुख्य चेहरा म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहिले जाते. नागरिकांच्या रोजच्या जीवन व्यवहाराशी शासन म्हणून ज्या काही अत्यावश्यक बाबी लागतात त्याची प्रतिपूर्ती ही अप्रत्यक्षपणे महसूल यंत्रणेच्या कर्तव्याचाच भाग असते. गावपातळीवरील तलाठ्यापासून ते जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परस्पर समन्वयामुळेच पूर, अतिवृष्टी सारखी आव्हानेही महसूल विभाग मोठ्या संयमाने हाताळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. महसूल दिनानिमित्त ओम गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ओम गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष समारंभास कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरव महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थित होते.

बदलत्या काळानुसार महसूल विभागातील जबाबदाऱ्याही वाढत चालल्या आहेत. यात उच्च तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पारदर्शकता वाढते आहे. सात-बारा पासून विविध प्रमाणपत्रांच्या ई-प्रणालीमुळे कामातील वाढलेली गती आपण सारेच अनुभवत आहोत. शासनाने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्याच्या पालनासमवेत पुढील काळात ई-ऑफीस प्रणालीसाठी अधुनिकतेचा अंगिकार, भावनिक बुद्धिमत्ता सुयोग्य पद्धतीने हाताळून नागरिकांप्रती सदैव संवेदनशीलता बाळगणे आणि आपल्या कामातील तत्परता वाढवणे ही काळाची प्राथमिक गरज आहे. याचे भान आपण सदैव बाळगाल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

नांदेड जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. येथील निसर्गाची आव्हाने वेळोवेळी महसूल यंत्रणेची परिक्षा घेणारी आहेत. याचबरोबर शासनाची विविध लोकाभिमूख अभियाने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे पोहचविण्याची आपली जबाबदारी आहे. महसूल विभागाने शासनाच्या सर्व विभागांशी योग्य समन्वय राखत, सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे “शासन आपल्या दारी” या अभियानाचा आदर्श वस्तुपाठ आपण राज्यापुढे देऊ शकलो, असेही त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यासाठी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची एक चांगली कॉलनी व्हावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही मागणी विचारात घेऊन आता वाघाळा गट क्र. 149, 150, 151 साठी सकारात्मक असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. यात पोलीस पाटील, कोतवालांचाही समावेश होता.

जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी महसूल कर्मचाऱ्यांना महसूल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. पोलीस विभाग व महसूल विभाग यांचा अतिशय चांगला समन्वय नांदेड जिल्ह्यात असून प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी परस्परातील असा समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेल्या कामांची वेळेत पूर्तता करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. ज्यांना उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी म्हणून हे पुरस्कार मिळाले आहेत त्यांची आता जबाबदारी अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले.

*महसूल विभाग प्रशासनाचा कॉर्नर स्टोन*
– कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
प्रशासनातील गतीमान पॅटर्न ही नांदेडची ओळख आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांनी जर सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या कर्तव्याला प्रामाणिकपणे प्राधान्य दिले तरच अशी ओळख निर्माण होऊ शकते, या शब्दात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले काढले. महसूल विभाग प्रशासनाच्या इमारतीचा कॉर्नर स्टोन आहे. काळाप्रमाणे ज्या काही जबाबदाऱ्या येतील त्या वेळेच्या आत तत्परतेने पूर्ण करण्याची जबाबदारीही महसूल यंत्रणेने स्विकारलेली असल्याने प्रशासनाचा मुख्य भाग हा तुम्ही आहात याची जाणीवही डॉ. भोसले यांनी करून दिली.

*महसूल विभागांतर्गत 6 अनुकंपधारकांना नियुक्ती आदेश बहाल*
महसूल दिनानिमित्त तत्पर प्रशासनाचा वेगळा मापदंड नांदेड जिल्हा प्रशासनाने आज प्रत्ययास दिला. महसूल विभागातील अनुकंपधारकांना प्राधान्यक्रमानुसार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या तत्परतेमुळे नियुक्ती आदेश बहाल झाले. शुभम शाम पाटील, चंद्रमय प्रकाश कदम, सुशिल वैजनाथ जाधव, ऋषिकेश रोहिदास मेहत्रे, श्रीमती प्रितिका नरेंद्र मुडगुलवार, शुभम बालाजी जेलेवाड यांना नियुक्तीपत्रे सन्मानाने देण्यात आली.
00000

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704