प्रतिभा निकेतन महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम संपन्न

नांदेड (दि. २६): महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित दि ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान “वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५” हा उपक्रम राबविण्याचे ठरविले होते. शासनाच्या आदेशानुसार नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयात “वाचन संकला महाराष्ट्राचा २०२५” हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
“वाचनसंकल्प महाराष्ट्राचा २०२५” या उपक्रमात महाविद्यालयात दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी ‘वाचन अभिवृद्धी उपक्रम राबविल्या गेला. यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांच्या वतीने विद्यार्थी व अध्यापकांना ग्रंथ भेट देण्यात आले.
दिनांक आठ जानेवारी रोजी विविध विषयावरील सुप्रसिद्ध ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. दि. ९ जानेवारी रोजी महाविद्यालयात “पुस्तक परीक्षण व कथाकथन” कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रा.डॉ. भारत कचरे यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व
पटवून दिले.
दि. ११ जानेवारी रोजी विद्यार्थी व अध्यापकांनी सामूहिक वाचन या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. दि. १४ जानेवारी रोजी “लेखक आपल्या भेटीला या उपक्रमात इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार डॉ. शंकर विभुते यांचे कथाकथन आयोजित करण्यात आले होते. दि. १५ जानेवारी रोजी व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन” या कार्यक्रमात वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे ग्रंगपाल डॉ अनिल जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यातही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
“वाचन संकल्पमराराष्ट्राचा २०२५” या उपक्रमातील पुस्तक परीक्षण व कथाकथन’ या कार्यशाळेत पुस्तक परीक्षण व कथाकथन ही स्पर्धा घेण्यात आली होती. कथा कथन स्पर्धेत कु. नेहा संजय हापगुंडे प्रथम, कु. श्रध्दा शेळके, द्वितीय तर कु. आर्तिका प्रकाश बुरके या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांका पटकाविला तर पुस्तक परीक्षण स्पर्धेत कु. अलका चौरे-प्रथम कु. किरण हरिदास मिरासे- द्वितीय, तर कु. दीक्षा जयवंत चांदोडे तृतीय क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थिनींना दि. २६ जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर गंगाखेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी, समन्वयक डॉ. रविंद्र लाठकर, प्रा.डॉ. संजय हापगुंडे याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक, व कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.