ताज्या घडामोडी

प्रा. राजपालसिंह चिखलीकर यांनी केनियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

नांदेड, (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर): नांदेड येथील शिक्षण क्षेत्रातून एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. प्रा. राजपालसिंह चिखलीकर यांनी नुकत्याच आफ्रिकेतील केनिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्य परिषदेत एका सत्राचे अध्यक्ष म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच ACLALS च्या साइन्टिफिक कमिटीने त्यांच्या संशोधन पेपरची निवड केली,त्यांनी “आफ्रिकन स्त्री व भारतीय दलित स्त्री यांचा अंतरविभाज्य स्त्रीवाद” या विषयावर पी. पी. टी द्वारे शोधनिबंध सादरीकरण केले.तसेच केनियाच्या नैरोबी विद्यापीठाच्या महात्मा गांधी ग्राजुएट ग्रंथालयात , इंग्रजी विभाग व इतर देशातील पी.एच डी अभ्यासाकांना महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरावरील पुस्तके भेट दिली.
ही अंतराष्ट्रीय परिषद असिसिएशन ऑफ कॉमनवेल्थ लिटरेचर अँड लॅगवेज स्टडी यांच्या माध्यमातून नैरोबी विद्यापीठ, केनिया येथे पाच दिवसाची होती.मागील आठवड्यात झालेल्या या परिषदेत जगभरातील जवळपास 32 देशांतील प्राध्यापक, संशोधक आणि लेखकांनी सहभाग घेतला होता.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत युनायटेड किंगडम, लंडन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, स्पेन, तुर्की, बेल्जियम, ऑस्ट्रिया यांसारख्या विविध देशांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. प्रा. चिखलीकर यांना मिळालेले हे अध्यक्षपद त्यांच्या इंग्रजी साहित्यातील सखोल ज्ञानाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानाची पोचपावती आहे.
केनियाचा हा दौरा प्रा. चिखलीकर यांचा चौथा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरा होता. यापूर्वी त्यांनी दुबई, मलेशिया आणि इजिप्त येथील विद्यापीठांनाही भेट दिली असून तेथेही त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय सहभागामुळे नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावली आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.