रामपूरी बु, येथे *छत्तीस* वर्षा नंतर वर्ग मित्राचे स्नेह मिलन सोहळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील रामपूरी बु, जिल्हा परिषद प्रशालेतील मार्च 1989 च्या इयत्ता दहावीच्या वर्गमित्रांचा 36 वर्षानंतर रामपूरी बु, येथे रोजी सर्व वर्ग मित्र यांच्या उपस्थितीत व श्री किशनराव जोशी, श्री अर्जुन नाईक सर,श्री काळे सर यांच्या उपस्थितीत व श्री उत्तम क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली *स्नेह मिलन* सोहळा भगवान मल्लिकार्जुन मंदिर रामपुरी बुद्रुक येथे संपन्न झाला.
या वेळी अनेक ठिकानावरून सर्व वर्ग मित्र आप आपल्या वाहनाने सकाळी दहा वाजल्या पासून कार्यक्रमास्थळी आले होते. भगवान मल्लिकार्जून यांच्या सभामंडपामध्ये शालेय जिवनातील शिस्तीचे पालन करून दोन दोनच्या रांगेत कार्यक्रमाच्या विशेष सभामंडपात प्रवेश करण्यात आला. तर सर्वप्रथम जून्या आठवणीला उजाळा देत एकमेकांचा पून्हा परिचय व त्यानंतर चहापाणी व स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मनोरंजनात्मक खेळ गप्पा गोष्टी व विविध कला गुण प्रदर्शन सर्व मित्रांनी सादर केले. यावेळी आप आपला परिचय देत असताना सर्व मुलांनी आपल्या बद्दल दिल खुलास पणे चर्चा घडवून आणली.
यावेळी अनोखे स्वागत, अनोखे प्रश्न व त्यांची उत्तरे, प्रश्न एक उत्तर अनेक एकमेकांचा परिचय, बालपणी उनाड व खोडकर तसेच गमती जमतीच्या आठवणी ,बालपणी सवंगड्यासहचे खेळ समूह भोजन आणि गप्पागोष्टी मध्ये दिवस रंगून गेला होता यावेळी सर्व वर्ग मित्रांनी ज्या मातीत आणि मातृ भूमीत शिक्षण घेतले अशा शाळेत जाऊन फोटो सेशन केले व जुन्या आठवणीला उजाळा देत बालपणीच्या जून्या आठवणी जाग्या केल्या. सुरुवातीला प्रथम ज्ञात अज्ञात वर्ग मित्र व गुरुजन आज हयात नसलेल्यांना *भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.* आपल्या काळातील गुरूंजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदरनिय गूरूवैर्य दैवतातूल्य श्री किशनराव गुरुजी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्व उपस्थित गुरूवैर्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शेवटी राष्ट्रगीताने या *मित्र* मेळाव्याचा समारोप करण्यात आला. मित्र मेळावा यशस्वी करण्यासाठी मुरलीधरजी लड्डा साहेबराव यादव, बाळासाहेब यादव, तुकाराम साठे, सुधीर ब्रम्हपुरीकर, सीमाताई लड्डा ,शोभाताई वट्टमवार त्या बरोबर सर्व वर्ग मित्रांनी मदत केली. तर यावेळी वर्गातील 50 मुले – मुली यावेळी *मित्र स्नेह मिलन* सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये हा *मित्रस्नेह मिलन* सोहळा संपन्न झाला. यावेळी सुधीर ब्रह्मपुरीकर यांनी यावेळ कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
**