संशोधन क्षेत्रातील नवीन संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा* -डॉ.राजाराम मान

*
नांदेड:(दि.२२ जानेवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयात पीएम -उषा योजनेअंतर्गत इनोव्हेशन व्याख्यानमालेतर्फे डॉ.राजाराम माने, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे “करिअरच्या संधीसाठी नाविन्यपूर्ण संशोधन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. त्याप्रसंगी विचारमंचावर व्याख्याते डॉ.राजाराम माने, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संभाजी वर्ताळे व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.बशीर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.संभाजी वर्ताळे यांनी व्याख्यानमालेचा उद्देश व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
व्याख्याते डॉ. राजाराम माने यांनी, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाद्वारे विविध क्षेत्रामध्ये करिअर घडवता येईल, याचे सखोल मार्गदर्शन केले. संशोधनात चिकाटी व सातत्य ठेवल्यास आपल्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, यांची अनेक उदाहरणे त्यांनी स्पष्ट केली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी अनेक शाखा उपलब्ध आहेत. त्यासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करावे तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात असणाऱ्या उपकरणांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप खानसोळे यांनी केले तसेच आभार देखील मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भौतिकशास्त्र विभागातील डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.विजय भोसले, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ.कविता केंद्रे, डॉ.दत्ता कवळे, डॉ.मदन आंबोरे, डॉ.अनिल कुवर, प्रा.शांतूलाल मावसकर, डॉ.निलेश चव्हाण , प्रा.संतोष राऊत व प्रा. स्नेहलकुमार पाटील यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.