ताज्या घडामोडी

जागतिक पर्यावरण दिना निमित्त मानवत नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपण*

मानवत / प्रतिनिधी.
——————————————
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानवत नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपण मानवत बसस्थानक परिसरात करण्यात आले. यावेळी परिसरात साफ सफाई स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत नगर परिषदेच्या वतीने
आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मानवत नगर पालिकेच्या सफाई विभागाच्या वतीने मानवत बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी स्वच्छता अभियान राबविताना यंत्राद्वारे केर कचरा उचलण्यात येऊन बस स्थानक व परिसर स्वच्छ करण्यात आले. याबरोबर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मानवत बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागे मध्ये वृक्षारोप करण्यात आले. मानवत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे. डॉ. अंकुशराव लाड. मानवत किराणा व्यापारी असोसिएशनचे सुरेशसेठ काबरा, योगगुरु सुरेश महाराज तिवारी, मानवत बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक माणिकराव तेलभरे, वृक्षमित्र चिंचोलकर, पक्षीमित्र रवि कच्छवे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छता बसस्थानक अभियानांतर्गत मानवत बसस्थानक मूल्यांकन समितीचे सदस्य व माजी जिल्हा मूल्यांकन समितीचे सदस्य व जेष्ठ पत्रकार के. डी. वर्मा. मानवत नगर परिषदेचे बांधकाम अभियंता अन्वर भाई. अधिकारी व महिला कर्मचारी तसेच मानवत नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातील अधिकारी व कामगार व महिला कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मानवत बसस्थानक परिसर स्वच्छता राखण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच वृक्षारोपण अभियाना मध्ये ही हातभार लावून वृक्षारोपण केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थितनां पर्यावरण निमित्त सामूहिक शपथ देण्यात आली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष महिला मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी *जागतिक पर्यावरण* या अनूसंगाने जागतिक पर्यावरण दिवस साजरे करतांना. वाढणाऱ्या दूषित पर्यावरणावर मात करण्यासाठी एक घर एक वृक्ष लावून तसेच आपले आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आपले घर आपली गल्ली आपली शहर स्वच्छ ठेवा. येणाऱ्या पावसाळ्या मध्ये रोग राई पसरू नये म्हणून स्वच्छतेची काळजी घ्या, असे आवाहन मानवत न.पा. मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले.
तर डॉ. अंकुशराव लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून साफसफाई स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पर्यावरण संतुलित राखण्यासाठी एक वृक्षरोपन करून त्याची योग्य काळजी घ्या. असे डॉ.अंकुश लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. याप्रसंगी मानवत शहरातील किराणा व्यापारी अशोसिएशनचे सदस्य सुरेशसेठ काबरा तसेच योगगुरु सुरेश महाराज तिवारी, मानवत बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक माणिकराव तेलभरे, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला व पुरुष नगर पालिकेतील सर्व कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.