ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद ‘सांस्कृतिक महोत्सव -2025’ वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

———————————-
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंद ‘सांस्कृतिक महोत्सव -2025’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप होते तर उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर चे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय ज्योती स्वामी, अध्यापक महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, फ्लोरेन्स नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागेसन तारे,उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव, उपप्राचार्य सतीश वाघमारे, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा अमर तांदळे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे सचिव सुमित शेल्हाळे, अध्यापक महाविद्यालयाचे सचिव संध्या लोहकरे,
सांस्कृतिक विभागांचे प्रमुख प्रा. मिनाक्षी घोडके विद्यार्थिनी प्रतिनिधी स्नेहा कोनाले, क्रिडा प्रतिनिधी मुस्तखिम शेख, सांस्कृतीक प्रतिनिधी शरयू घोगरे, यांच्या सह सर्व वर्ग प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी या स्नेहसंमेलनात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून उदघाटन कऱण्यात आले. यावेळी उदघाटक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे.आपल्या सुप्त गुणांना प्रदर्शित करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी अशा स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यानी मोठया संख्येने सहभागी झाले पाहिजे.अभ्यास तर महत्वाचा आहेसच पण आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाठी ही स्नेहसंमेलने महत्वाची ठरतात. या कार्यक्रमातून उद्याचा मोठा कलावंत निर्माण झाला पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, आपल्या महाविद्यालयात विद्यार्थीना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. त्यासाठी वेग-वेगळे कौशल्य आत्मसात करणे विद्यार्थीनी गरजेचे आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःहून आपणच आपली वाट निवडली पाहिजे.यश भेटत नाही तर यश प्राप्तीसाठी मेहेनत करावी लागते. आजचं युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात ज्ञान प्राप्त करावे. आपल्याला शिकविणाऱ्या गुरूचा नेहमी आदर करावा असे ते म्हणाले.
सदरील स्नेहसंमेलनात स्वामी विवेकानंद महाविद्यालय व स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, लावणी, हिंदी गीत रिमिक्स, लोकगीत अशा एका पेक्षा एक सरस गीतावर आपली कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकत उत्साह शिंगेला पोहचवला. तर विद्यार्थ्याचा सर्वात आवडीचा व आकर्षक असा शेलापागोटे हा कार्यक्रम देखील संपन्न झाला.
यावेळी ‘क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव -2025’ निमित्त महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धाकाला मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.शेषनारायण जाधव व अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार यांनी केले. यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव सुमित शेल्हाळे व संध्या लोहकरे यांनी आपल्या महविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी महाविद्यालयात होत असलेल्या विविध कार्यक्रमाचा तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचा व अंमलात आणलेल्या योजनांचा उल्लेख करीत महाविद्यालयांमध्ये झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचलन प्रा.राखी शिंदे, प्रा. ऋतूजा डिग्रस्कर व शेलापागोटे यांचे प्रा.अमर तांदळे यांनी केले तर आभार वैभव बिडवे यांनी मानले. हे स्नेसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. राशिद दायमी,प्रा.आकाश कांबळे, प्रा.असिफ दायमी, प्रा. नम्रता कुलकर्णी, रोहिणी वाघमारे, प्रा. अनुजा चव्हाण, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. आवेज शेख, प्रा. नावेद मणियार,
प्रा. बालाजी सकणुरे, अमोल भातकुळे, प्रदीप पाटील, अपर्णा काळे, यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.