बारावीच्या परिक्षेवर तिसऱ्या डोळ्याची नजर ; विद्यार्थ्यांनी घाई गरबड न करता शांततेत पेपर सोडवावा जिल्हाधिकारी रघूनाथ गावडे.

संपूर्ण जिल्हात आज पासून १२ वी ची परिक्षेस प्रारंभ झाला असून मानवत १६९७ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा देणार असून या संपूर्ण परिक्षेवर तिसर्या डोळ्याची नजर राहणार आहे.
मानवत // प्रतिनिधी.
———————————
मानवत तालूक्यात कॉपीमुक्त वातावरणात दहावी आणि बारावीच्या परीक्षा व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारपासून १२वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. तालुक्यातील ५ केंद्रांवर १ हजार ६९७विद्यार्थी इंग्रजीचा परीक्षा देणार असून, सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे कॉपी करताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १२ मार्चदरम्यान, तर २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा होत आहे. त्यानुषंगाने शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली आहे.
परीक्षा तणावविरहीत आणि कॉफीमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. शिक्षण विभागाचे माध्यमिक व प्राथमिक, योजना, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि विशेष महिला भरारी पथक अशी
*( बारावी परीक्षेला सुरुवात जिल्हाधिकारी रघूनाथ गावडे यांची परिक्षा केंद्रांना भेट.)*
पथके नेमण्यात आली आहेत. तालुकास्तरावर एक पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवरही नजर राहणार आहे. ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल, त्या शाळेच्या परीक्षा केंद्रावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे संबंधित केंद्रप्रमुखांनी परीक्षा काळात सतर्क राहून राहून काम करावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
यावर्षी जिल्हाभरात कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार असल्याने अनेक केंद्रावर बैठे पथकांची नजर राहणार आहे. दरम्यान, परीक्षेला जाताना उपाशीपोटी जाऊ नये. हॉल तिकीट, घड्याळ व पाण्याची बाटली सोबत ठेवावी, एकाच रंगाचे काळे किंवा निळे दोन पेन आणि कंपास सोबत ठेवावा. पुरवणी दोऱ्याने बांधावी, स्टॅपलरचा वापर करू नये, लिखित स्वरूपातील कोणतेही साहित्य जवळ ठेवू नये. शब्दावर रेष असावी, दोन शब्दामध्ये पुरेसे अंतर असावे. वारंवार पाणी पिण्यास उठू नये. वेळेचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी अतिरिक्त ताण न घेता, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.
*( १२०८ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा. )*
मानवत तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी तीन केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. जि.प. प्रशाला कोल्हा केंद्रावर २२४, शंकुतलाबाई कत्रूवार विद्यालय मानवत केंद्रावर ४३४, नेताजी सुभाष विद्यालय मानवत केंद्रावर ५५० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
*( केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर तिसर्या डोळ्याची नजर )*
—————————————————————
परीक्षेदरम्यान परीक्षार्थीना केंद्राबाहेरून कॉपी देण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण होते. इतर विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
*चौकट टाकणे.*
*(प्रतिक्रिया )*
दहावी, बारावीच्या परीक्षांना सुरु झाल्या आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन केले आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी, यासाठी सर्व शिक्षक, प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून, कॉपीचा प्रकार आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.
मनोज चव्हाण,
( गटशिक्षणाधिकारी )
*तालूक्यातील 5 केंद्रावर परिक्षा*
——————————————————
१) रत्नापूर केंद्रावर ४९१,
(२) केके एम महाविद्यालय केंद्रावर ३०४, (०३ ) लिमरा कला, विज्ञान वाणिज्य रामपुरी येथील केंद्रावर ३२७,
(०४ ) महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, रामेटाकळी केंद्रावर ३०९,
(०५ ) तर सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, मानवत केंद्र येथे २६६ असे *एकूण १६१७* विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
.