अधिकार्यांच्या संगणमताने गूत्तेदारांची मनमानी* *रस्ता कामासंबंधी समाजमाध्यमावर पोस्ट; ग्रामिण जनते मधून संताप*: *स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यांच्या जिव्हाळ्याच्या रस्ता प्रश्नासाठी आंदोलनाच्या तयारीत.

Correspondent / Anil chavan
mcr.news / manwat.
———————————————————————
मानवत ते पाळोदी या १२ किमी रस्त्याच्या कामाला निधी मिळाल्या नंतर कामाला सुरुवात झाली आहे. या मध्ये मानवत ते सावळी पर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाला बगल देत मातीमिश्रित खडी, प्रमाणापेक्षा कमी खोदकाम तसेच दबाई करताना पाण्याचा वापर केला जात नसल्याने या रस्त्याचे काम बोगस होत असल्याचा आरोप या रस्त्यावर असलेल्या गावातील ग्रामस्थांकडून केला जात आहे. रस्त्याच्या कामासंबंधी समाजमाध्यमावर पोस्ट करीत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.
( मानवत ते पाळोदी रस्त्यावर हत्तलवाडी, सावळी, बोंदरवाडी, खडकवाडी, सावरगाव, सोनुला, )
अंदाजपत्रकाप्रमाणे काम होईना
• मानवत ते सावळी रस्त्याच्या साइट पट्याचे खोदकाम हे कुठे पाच इंच, कुठे सहा इंच एवढेच केले आहे आणि सदरील खोदकाम हे भरताना जो मुरुम (खडक) हा माती मिक्स आहे. त्यावर गिट्टीच टाकण्याचे काम सुरू आहे, मात्र पाणी कुठेही वापरलेले नाही. परिणामी, रस्त्याने धूरळा उडून छोटे- मोठे अपघात होऊन सामान्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. अंदाज पत्रकात एक फूट रस्ता खोदकाम असताना खोदकाम कमी प्रमाणात होत आहे. अंदाज पत्रका प्रमाणे काम होत नसल्याचे दिसून येत आहे.
पाळोदी पिंपळा, जंगमवाडी, लोहारा, भोसा या गावांतील ग्रामस्थ ये-जा करतात. या परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील पीक बाजारपेठेत आणण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करतात. मागील दोन वर्षांपासून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने चालविताना
(चौकट )———————————————————————
मानवत ते पाळोदी रस्त्याचे काम करणारा ठेकेदार अंदाज पत्रकाला बगल देऊन काम करत आहे. परिणामी, रस्ता निकृष्ट दर्जाचा होत आहे. सा. बां. विभागाने दर्जा सुधारण्या संदर्भात कडक सूचना द्याव्यात.
– नामदेव काळे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मानवत
————————————————————————
रस्त्याच्या कामाची पाहणी
करण्यात आली असून, रस्त्याच्या कामाची गती वाढवावी व दर्जा सुधारण्याच्या संदर्भात ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत.
– व्ही. लव्हेकर, कनिष्ठ अभियंता, पाथरी
————————————————————————
तारेवरची कसरत करावी लागत होती. या रस्त्याच्या कामाला फेब्रुवारी मध्ये निधी मिळाला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला एप्रिल
महिन्यात सुरुवात झाली. या १२ किलो मिटर रस्त्याचे काम दोन ठेकेदारांना विभागून दिले आहे. यापैकी एकाने मानवत ते सावळी पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी सावळी पासून आठ किलो मीटर पर्यंत मानवत पर्यंत रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराने खोदकाम केले आहे. अंदाज पत्रका प्रमाणे खोदकाम झाले नसल्याचे दिसून येत आहे. खोदकाम केलेल्या रस्त्यावर माती मिश्रित मुरुमाचा वापर मोठ्या प्रमाणात करून ठेकेदाराने खोदलेल्या रस्त्यावर थातूर मातूर पद्धतीने भर टाकून जाड खडी अंथरून ठेवली आहे. अंथरलेल्या खडी आणि मुरूम दबाईचे काम सुरू असून हे काम करताना खडीवर आणि मुरमावर पाणी वापरले जात नसल्याचे दिसून येत आहे. अधिकारी यांच्या संगणमताने हि कामे होत असल्याने गूत्तेदारांनी मनमानी चालविली आहे. त्यामूळे बोगस कामे होत असल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी समितीच्या वतीने चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामिण जनते मधून व्यक्त केल्या जात आहे, तर या बोगस कामासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालूकाध्यक्ष आंदोलनाच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे.
**