नांदेड येथे मेडिको लीगल दोन दिवसीय काँफरन्स -थाटामाटात संपन्न

नांदेड : नांदेड आयएमए शाखेच्या वतीने दोन दिवशीय मेडिको लीगल
परिषद संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन डॉ. संतोष कदम, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. विंकी रघुवाणी डॉ.संजय कदम, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. अजय नारायणकर, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. समाजात डॉक्टरांना देव मानले जाते ती प्रतिमा कायम राहावी आणि डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील संवाद उत्तम राहावा.
डॉक्टरांनी प्रॅक्टिस करत असताना बदलत्या काळानुसार डॉक्टरला वैद्यकीय ज्ञानसोबत कायद्याचे ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. या परिषदेमध्ये डॉक्टरांच्या कामाशी संबंधित कायदेशीर मुद्दे, त्यांच्या कर्तव्यांची अटी आणि कायद्याच्या अंतर्गत त्यांची जबाबदारी या विषयी अवगत करण्यात आले..यामुळे डॉक्टर निर्भीडपणे आणी कायद्यानुरूप रुग्ण सेवा करू शकतील. याचा फायदा जेवढा डॉक्टर ला होईल त्यापेक्षा अधिक रूग्णाला होईल. या परिषदे मध्ये देशभरातून कायद्याचे ज्ञान असलेली डॉक्टर मंडळी , वकील , पोलिस अधिकारी ,नगर पालिकेचे अधिकारी , निवृत न्यायाधीश या सारखे मान्यवर आपले योगदान दिले. या परिषदेला सर्व म्हणजे आधुनिक चिकित्सा करणारे डॉक्टर , वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ,या डॉक्टर मंडळी उपस्थित होती. ही कॉन्फरन्स हायब्रिड म्हणजे ऑफलाइन आणी ऑनलाइन या दोन्ही स्वरूपात संपन्न झाली .: डॉक्टरांच्या कार्याबद्दल कायदेशीर दृष्टीकोन, जबाबदारी, आणि प्रॅक्टिस संबंधित कायद्याची माहिती
या काँफरन्समधून, डॉक्टरांना त्यांच्याशी संबंधित कानूनी कायदे(बॉम्बे नर्सिंग होमॲक्ट,फायर ॲक्ट,महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड,गर्भ लिंग निदान कायदा,एम टी पी ॲक्ट,कं ग्राहक संरक्षण कायदा इत्यादि), आपल्या कामाबद्दल तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन, तसेच संभाव्य कायदेशीर अडचणींना समजून त्यावर उपाय योजना करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदे मध्ये प्रमुख मुद्दे असे हाती घेतले त्यामध्ये वैद्यकीय व्यावसायिकांची कायदेशीर जबाबदारी, पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील कायदेशीर संबंध,
मेडिकल प्रॅक्टिस संदर्भातील कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल,
वैद्यकीय दावे आणि वाद निवारण
डॉक्टरांच्या कामाशी संबंधित गोपनीयता आणि सुरक्षा उपाय इत्यादी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेमध्ये चौदाशे डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. दोन दिवशीय परिषदेचे सूत्रसंचालन हे डॉ. संगीता मसारे डॉ. शुभांगी पवार डॉ. पूजा तोष्णीवाल डॉक्टर प्रियंका पावडे डॉक्टर वैशाली देशमुख डॉक्टर सबा खान डॉक्टर निशांत जोशी परिषद यशस्वी करण्यासाठी आयोजक डॉ. प्रल्हाद कोटकर डॉ.सचिन चांडोळकर डॉ. सुनील मसारे खजिनदार राजेश तगडपले,राहुल लव्हेकर डॉ.जकिर पटेल इत्यादींनी परिश्रम घेतले.