युवकांनी स्टार्टअप्स तंत्रज्ञानाच्या आधारे उत्कर्ष साधावा -प्रा.डॉ.शैलेश वढेर

*
नांदेड:( दि.११ जानेवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयातील इनोव्हेशन आणि इनक्यूबिशन सेंटरतर्फे पीएम-उषा अंतर्गत इनोव्हेशन व्याख्यान मालिकेतर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ फार्मसीचे डॉ.शैलेश वढेर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. याप्रसंगी विचारमंचावर इनोव्हेशन व्याख्यानमालिका समन्वयक डॉ.संभाजी वर्ताळे व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.बशीर उपस्थित होते.
प्रारंभी प्रस्तावना व वक्त्यांचा परिचय डॉ.संभाजी वर्ताळे यांनी करून दिला.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात चाललेल्या पीएम-उषा अंतर्गत विविध उपक्रमांचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या जीवनात उत्कर्ष साधावा, असे आवाहन केले.
प्रमुख वक्ते प्रो. शैलेश वढेर यांनी, विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील येणाऱ्या विविध अडचणीवर अभ्यास करून सोप्या पद्धतीने त्यावर तोडगारूपी छोटे छोटे उद्योग कशा पद्धतीने सुरू करता येतील, याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास विविध शाखेचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार डॉ.संदीप खानसोळे यांनी मानले.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पद्माराणी राव, डॉ.पी.आर.मिरकुटे ,डॉ. शिवराज शिरसाट, डॉ.कविता केंद्रे, डॉ. सुभाष जुन्ने, डॉ.विजय भोसले, डॉ.दत्ता कवळे, डॉ.अनिल कुवर, डॉ.मदन आंभोरे, प्रा.संतोष राऊत, प्रा. शांतुलाल मावसकर, प्रा.स्नेहलकुमार पाटील, किशन इंगोले यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.