https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अल्पवयीन मुलीसोबत चाळे करणारा चालक ताब्यात

नांदेड : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीस एका स्कुल व्हॅनमध्ये कोंबून नेऊन तिच्यासोबत चाळे करतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ दखल घेत सदर व्हॅनचालकास ताब्यात घेतले. सदर घटना मंगळवारी दुपारी घडली.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळा रोड परिसरामध्ये एका स्कुल व्हॅनमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत चालक अश्लिल चाळे, छेडछाड करतानाचा व्हिडीओ दुपारी व्हायरल झाला. या घटनेची उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नाईक, पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांनी तात्काळ दखल घेतली. काही तासात संशयित

आरोपी व व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यासाठी ठाण्याच्या हद्दीत शोधमोहिम राबवली. काही तासात तरोडा नाका परिसरामधून त्या चालक व व्हॅन ताब्यात घेण्यात आली. सदर घटनेबाबत संशयित आरोपीची चौकशी केली असता

त्याने गुन्हा कबूल केला असून त्याचे नाव

अब्याज मोहम्मद फैय्याज (वय २३) रा. राजेशनगर, नांदेड असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांनी सांगितले. सदर घटनेतील मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कुल व्हॅनचालक या अल्पवयीन मुलीला कॅनॉल रोडवरील डीमार्ट परिसरातील एका निर्जनस्थळी व्हॅनमध्ये घेऊन गेला होता. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकत्यांसह पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरच या प्रकरणाला वेगळे वळण मिळू नये, तणाव वाढू नये याची पोलिसांनी दक्षता घेत अवघ्या काही तासातच व्हॅनचालकाला ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704