यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महाराष्ट्र अर्थसंकल्प2023 व निर्गुंतवणूक धोरण या विषयावर व्याख्यान संपन्न

नांदेड :(डॉ. प्रवीण कुमार सेलुकर) नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र पदवी व पदव्युत्तर विभागाच्या वतीने 24 मार्च रोजी अर्थसंकल्प 2023 व निर्गुंतवणूक धोरण GBया विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांथी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय, लोहा येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एन. एन. मुंडे हे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. आर. मुठे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी प्र कुलगुरू डॉक्टर जी. एन. शिंदे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी आर मुठे यांनी यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती दिली विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्याला लागणारे मार्गदर्शन अर्थशास्त्र विभागाच्या वतीने सातत्याने केले जाते जेणेकरून तो यश प्राप्त करेल. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्तेयांच्या हस्ते
म्युच्युअल फंड व कल्याणकारी अर्थशास्त्रातील अमर्त्सन यांचे योगदान या विषयावरील
*अर्थनीती* या भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच हिवाळी परीक्षा 2022 मध्ये प्रिय प्रथम वर्ष सांख्यिकी बीए द्वितीय वर्ष संख्यात्मक तंत्र व मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक डॉ. एन. एन. मुंडे यांनी अर्थसंकल्प 2023 व निर्गुंतवणूक धोरणावर विद्यार्थ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन करताना त्यांनी अर्थसंकल्पात सरकारने घेतलेले निर्णय शेतकऱ्यांना दिला जाणाऱ्या योजना, उदाहरणार्थ शेततळे योजना, कर्जमाफी योजना, जलयुक्त शिवार, पिक विमा योजना तसेच अर्थसंकल्पात महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, मुलींच्या सक्षमीकरणासाठी घेतलेले निर्णय, प्रधानमंत्री आवास योजना, ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या योजना, नागरिकांच्या आरोग्य सुविधासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना, इत्यादीबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती दिली तसेच निर्गुंतवणूक म्हणजे काय निर्गुंतवणुकीचे फायदे तोटे तसेच निर्गुंतवणुकीमुळे सरकारचे आर्थिक ओझे कशाप्रकारे कमी होते, आजारी उद्योग जर तोट्यात चालत असतील तर त्यामुळे सरकारला कशा प्रकारे आर्थिक बोजा सहन करावा लागतो, सार्वजनिक वस्तू ,गुणवत्ताधारक, वस्तू व खाजगी वस्तू म्हणजे काय याबद्दल त्यांनी विद्यार्थ्याला सविस्तर अशी मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माजी प्र कुलगुरु डॉक्टर जी एन शिंदे अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा करिअर कट्टा चे जिल्हा समन्वयक डॉक्टर पी आर मुठे डॉक्टर ज्ञानेश्वर पुपलवाड ,डॉक्टर डी डी भोसले, डॉक्टर प्रवीण कुमार सेलूकर, डॉक्टर शिवराज आवाळे ,डॉक्टर योगिता पवार ,डॉक्टर एस बी पाटील प्राध्यापक राहुल लिंगमपल्ले, प्राध्यापक नयना देशमुख, प्राध्यापक आकांक्षा भोरे आदीसह व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एस बी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर शिवराज आवाळे यांनी केले