https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

जिद्द, चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली : ए पी आय दुर्गा बारसे*

नांदेड: सततची जिद्द आणि चिकाटी हीच यशाची गुरुकिल्ली होय असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गा बारसे यांनी केले.प्रतिभा निकेतन महाविद्यालयात लोकप्रशासन व राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थी जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे हे समजले पाहिजे. विद्यार्थी जीवनात शिस्त व नैतिकता महत्त्वाची असून कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही यश संपादित करता येऊ शकत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. समाज माध्यमाचा व्यक्तिगत विकासासाठी विद्यार्थ्यानी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा यावर त्यांनी यावेळी भर दिला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी व लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ.दीपक वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकप्रशासन विभागाकडून महानगरपालिका या विषयावर एक भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. दिलीप स्वामी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. दीपक वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेश चालिकवार यांनी केले. यावेळी विभागातील डॉ. श्रीकांत केंद्रे, डॉ. मेघा पाठक, डॉ.ममता देशमुख अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पवन वाघमारे तसेच महाविद्यालयातील डॉ. रवींद्र लाठकर, डॉ. पराग साले, डॉ. बाबू गिरी, डॉ. प्रवीण सावंत, डॉ. राजेश कुंटूरकर, प्रा. व्हि.डी जाधव, डॉ.यादव डॉ.महेश बंग, डॉ.भुसारी संगीता,डॉ. पारीख, प्रा. हाके आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704