https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

भोकर रेल्वे स्टेशनचा कायापालट या कामाचे माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता भूमिपूजन सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला

नांदेड:भोकर रेल्वे स्टेशनचा कायापालट या कामाचे माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता भूमिपूजन सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला. तसेच भोकर रेल्वे स्टेशन येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित राज्यसभेचे खा.अशोकराव चव्हाण उपस्थितीत ऑफलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडला. यासह जिल्ह्यातील नांदेड हुजूर साहिब, उमरी, धर्माबाद, हिमायतनगर या रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. तसेच भुयारी मार्ग व उड्डान पुलांच्या कामांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.
यावेळी विधान परिषदेचे माजी आ.अमरनाथ राजुरकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, भारतीय जनता पार्टीचे महा विजय 2024 मराठवाडा संयोजक प्रवीण साले, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष गणेशराव पाटील कापसे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप सोनटक्के, संतोष मारकवाड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लघळूदकर, जगदीश पाटील भोसीकर, लोकसभा सोशल मीडिया सहसंयोजक सचिन कल्याणकर, शहराध्यक्ष विशाल माने, युवा मोर्चाचे श्रीकांत किन्हाळकर, भास्कर डोईबळे, अक्षय अमिलकंठवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704