https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये डॉ.लक्ष्मण डोंगरे यांचे मानवी हक्कावरील व्याख्यानाचे आयोजन

नांदेड:(दि.२५ ऑगस्ट २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मानवी हक्क या व्हॅल्यू ॲडेड कोर्स अंतर्गत दि.२६ ऑगस्ट २०२३, शनिवार रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता मानव्य विज्ञान विद्या शाखा आयसीटी हॉलमध्ये हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण डोंगरे यांचे ‘२१ वे शतक आणि मानवी हक्क’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

याप्रसंगी गतवर्षी मानवी हक्क हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉक.गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत.
तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.
———————————————
——-

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704