एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला बोध कथा:गाढव आणि वाघ

एक दिवस गाढव आणि वाघ यांची भेट घडली.वाघाला पाहून वाघाची घाबरगुंडी उडाली.मात्र वाघाने गाढवाला शब्द दिला की तो गाढवाला खाणार नाही.तेव्हा कुठे गाढवाला विश्वास बसला.काहीतरी बोलायचे म्हणून गाढव वाघाला म्हणाला -“वाघदादा,मला इथे जे गवत आहे ना,ते पिवळे दिसत आहे.”यावर वाघ म्हणाला -“अरे वेड्या! गवत कधी पिवळे असते का?गवत हिरवेच असते.” झालं!त्यांच्यात वादावादी सुरू झाली.त्यांनी आता निवाडा करायला सिंहाकडे जायचे ठरवले.गाढव शहाणपणा करत सिंहासमोर जमलेल्या प्राण्यांना सांगतो -“मी म्हणतो की गवत पिवळे असते.पण वाघदादा ऐकतच नाही.वाघदादा म्हणतात की गवत हिरवे असते.तुम्हीच सांगा आता काय खरे आणि काय खोटे.”
सिंह हळूच हसत म्हणाला -“गाढवाचे म्हणणे अगदी बरोबर आहे.गवत तर पिवळेच असते.”
असे म्हणून सिंह वाघाला एक वर्षाची शिक्षा ठोठावतो.गाढव खूप खुश होतो आणि नाचत-नाचत जंगलात निघून जातो.दरबार संपल्यावर वाघ सिंहाला म्हणतो -“महाराज, तुम्हाला माहिती आहे की गवत हिरवं असतं.तरीही तुम्ही मला शिक्षा का केली?”यावर सिंह म्हणाला -“मी तुला याकरिता शिक्षा केली की,तो तर गाढवच आहे शेवटी.पण तू उगाच एका गाढवासोबत वाद घालत बसून स्वतःचा वेळ वाया घालवलास.”
एकंदरीतच काय, ध्येय गाठायचे असेल तर आपल्या कामात अडथळा निर्माण करणा-या गाढवांकडे दुर्लक्ष करीत आपल्या ध्येयपूर्तीसाठी काम करावे.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर