अशोक कुबडे लिखित गोंडर कादंबरीला मराठा वाचन मंदिर चा प्रथम पुरस्कार प्रदान

अशोक कुबडे लिखित गोंडर कादंबरीला मराठा वाचन मंदिर चा प्रथम पुरस्कार प्रदान*
नांदेड:
मराठा वाचन मंदिर मुंबई गेल्या 77 वर्षापासून साहित्य क्षेत्रात कला संस्कृती या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या साहित्यातील कादंबरीचा प्रथम पुरस्कार गोंडर या कादंबरीला मिळाला. रोख रक्कम,सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .प्रसिद्ध साहित्यिक “आमचा बाप आणि आम्ही” या पुस्तकाचे लेखक मा.डॉ.नरेंद्र जाधव,डॉ. अजय काकोडकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला..फोटो बाकी अहेत..मराठा मंदिर साहित्यिक संस्था मराठी साहित्यात अतिशय प्रतिष्ठेची आणि दर्जात्मक काम करणारे संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेब असून कार्यकारी मंडळी आहे. या संस्थेतील पदाधिकारी संचालक कर्मचारी आदींच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधून खूप आनंद झाला. गोंडरमुळे मुंबई पाहता आली आणि मुंबईचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारता आला.. याचा प्रचंड आनंद आहे.. या आनंदात प्रकाशक/ वाचक रसिक सर्वजण सहभागी आहात. हा पुरस्कार तुमचा सर्वांचा आहे..
धन्यवाद..!
*अशोक कुबडे*