ताज्या घडामोडी
एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “भेट”

भेट
**************************
तुझी माझी भेट घडली
फक्त काही क्षणांची
जुळली आपुली नाती
त्या दोन घडीची
तुझ्या नजरेला नजर देता
झुकली तुझी नजर विनयाची
कळली मज त्यावेळी
भाषा सखे प्रणयाची
नजरेच्या या लपंडावात
साथ होती पापण्यांची
हळूच जाणवली मज स्पंदने
धडधडत्या हृदयाची
तुला पाहतच राहिलो
पडली भुरळ तुझ्या सौंदर्याची
भेट आजही आठवते
त्या गोड मधुर क्षणांची
**************************
लैलेशा भुरे
नागपूर