ताज्या बातम्या
इरळद येथील विदयुत पुरवठा सुरळीत करा;तालूकाध्यक्ष माऊली दहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहाय्यक अभियंता यांच्याकडे मागणी

मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौजे इरळद येथील विदयुत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी दिनांक ०५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सहाय्यक अभियंता यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मानवत तालुक्यातील मौ. इरळद येथे अखंड हरीनाम साप्ताह सुरु असून येथील विद्युत पुरवठा सुरळीत ठेऊन सकाळी होणारी लोडशडींग १० डिसेंबर पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात असून निवेदना वर माऊली मुळे, रोहित मुळे, दशरथ बनगर, माऊली भाऊ दहे, संतोष भाऊ कुऱ्हाडे यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.
**