https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

*

मुंबई, दि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस शाश्वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालिन संस्थानिकांना दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्‍याची जबाबदारी सोपविलेली आहे.
या समितीचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) असून विभागीय आयुक्‍त, छत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्‍य सचिव आहेत आणि अपर मुख्‍य सचिव (महसूल) व प्रधान सचिव, विधी व न्‍याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्यासह मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी हे या समितीचे सदस्‍य आहेत.

समितीची पहिली बैठक दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत झाली. या बैठकीमध्‍ये समितीच्‍या कार्यकक्षेबाबत सविस्‍तर चर्चा होऊन समितीच्‍या पुढील कामकाजाची दिशा ठरविण्‍यात आली. तसेच या पूर्वीच्‍या समितीने या विषयासंबंधाने निजामकालिन जुने महसुली अभिलेखे तपासण्‍यासाठी राज्‍य शासनाचे एक पथक हैदराबाद येथे अभिलेखांचा शोध व तपासाबाबत पाठविले होते. या पथकास निजामकालिन जुन्‍या अभिलेखातील सनदा, मूंतखब, करार, जनगणनेचे अभिलेखे इत्‍यादी तपासण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या जमाबंदी आयुक्‍तांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या कार्यालयातील काही अधिकारी व विभागीय आयुक्‍त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील अधिकारी यांच्‍या पथकाने हैदराबाद येथे भेट दिली. त्‍यांच्‍या सोबत मोडी लिपी व ऊर्दू भाषा जाणकार व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍यात आला होता. या पथकाने दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी हैदराबाद येथे भेट देऊन जुने निजामकालिन महसुली अभिलेखे, जनगणना अभिलेखे, अबकारी विभागाचे अभिलेखे व पुरातत्‍व विभागाकडील अभिलेखे, मूंतखब इत्‍यादींची पाहणी केली व पथकाने उपलब्‍ध मूंतखब अभिलेख्‍यांच्‍या प्रती स्‍कॅन करुन सोबत आणल्‍या. याबाबतची माहिती समितीच्‍या पहिल्‍या बैठकीत देण्‍यात आली.

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची दुसरी बैठक 15 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये मराठवाड्यातील जुने महसुली अभिलेखे, जन्‍म-मृत्‍यू नोंदीचे अभिलेखे, 1967 पूर्वीचे शैक्षणिक अभिलेखे, पोलिसांकडील गुन्‍हा नोंद रजिस्‍टर, अबकारी विभागाकडील अभिलेखे, वक्‍फ बोर्डाकडील अभिलेखे, सैनिक कल्‍याण विभागाचे अभिलेखे, कारागृह विभागाकडील नोंदी इत्‍यादींची तपासणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. तसेच यापूर्वी कुणबी जातीची दिलेली प्रमाणपत्रे, नाकारलेले अर्ज, जात वैधता पडताळणी समितीकडून वैध ठरविण्‍यात आलेली प्रकरणे, अवैध ठरविलेली प्रकरणे व अवैध ठरविण्‍याचे कारण याबाबत जिल्‍हानिहाय तपासणी करुन जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करण्‍याचे बैठकीत निर्देश देण्‍यात आले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704