https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मधील प्रा.गुंजकर व डॉ. गव्हाणे यांचे राष्ट्रीय स्तरावर सुयश

नांदेड:(दि.८ नोव्हेंबर २०२३)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर आणि डॉ.अजय गव्हाणे यांना मास्टर्स गेम्स असोसिएशन ऑफ कर्नाटकतर्फे हुबळी येथे दि.४ व ५ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त झाले आहे.

कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र विभागातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, मिडले रिलेमध्ये सुवर्णपदक, ५० मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य, ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य, १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य, आय.एम. २०० मीटर मध्ये रौप्य, १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रजत आणि ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रजत पदक प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत एकूण नऊ पदके प्राप्त करून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे.
तसेच वरिष्ठ महाविद्यालय राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांना ५० मीटर मिडले रिलेमध्ये सुवर्ण, ५० मीटर फ्रीस्टाइल रिलेमध्ये रौप्य आणि १०० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये रजत पदक प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या सुयशाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन यथोचित सत्कार व गौरव केला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची उपस्थिती होती.
या सुयशाबद्दल उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.सुरेश तेलंग, डॉ. शिवराज बोकडे, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.बालाजी भोसले, प्रा.चौसटे, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.धनराज भुरे, डॉ.प्रवीण तामसेकर, क्रीडा संचालक डॉ.मनोज पैंजणे, डॉ.बशीर बारी, डॉ. विजय भोसले, डॉ.सुभाष जुन्ने,प्रा.नितीन नाईक, डॉ.संजय ननवरे, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.कविता केंद्रे, प्रा.राजश्री जी. भोपाळे, डॉ.रामराज गावंडे, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.मीरा फड, डॉ.अजय मुठे, प्रा.उत्तम केंद्रे, प्रा.सचिन अपस्तंभ, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, डॉ.एकनाथ मिरकुटे, प्रा.नरेंद्र कंचटवार आदींनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704