सर्वस्पर्शी व करिअरच्या संधी असलेला विषय म्हणजे इतिहास -डॉ.डी.डी.कोल्हेकर

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
इतिहासाचा संबंध सर्वच सामाजिक शास्त्राशी येत असल्यामुळे इतिहास हा सर्वस्पर्शी विषयी असून त्यामध्ये करिअरच्या अनेक संधी असल्याचे उद्गार यशवंत महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने शैक्षणिक वर्ष:२०२५- २६ मध्ये बी.ए.प्रथम वर्गात इतिहास विषय घेऊन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांकरिता माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित सत्रारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ.डी.डी. कोल्हेकर यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या तसेच उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ.डी. डी.कोल्हेकर म्हणाले की, इतिहासाच्या विद्यार्थ्याला पुरातत्व खात्यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील संग्रहालयामध्ये नोकरीच्या संधी असून स्पर्धा परीक्षाकरीता सुद्धा इतिहास हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे म्हणाल्या की, इतिहासाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना तयार होण्यास मदत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांनी केले तर प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे) यांनी करून दिला.
सूत्रसंचालन डॉ.साईनाथ बिंदगे यांनी केले तर आभार प्रा.राजश्री भोपाळे यांनी मानले.
कार्यक्रमास बी.ए.प्रथम वर्गात इतिहास विषय घेऊन प्रवेशित झालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.