ताज्या घडामोडी

यशवंत ‘ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

नांदेड:( दि.४ जानेवारी २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते तर प्रमुख वक्त्या म्हणून शरदचंद्र महाविद्यालय, नायगाव येथील सेवानिवृत्त प्रा.डॉ.कल्पना राम जाधव होत्या.
त्यांनी, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. ज्या काळामध्ये स्त्रियांना समाजामध्ये व कुटुंबामध्ये दुय्यम दर्जाचे स्थान होते; त्याचबरोबर स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच सीमित होते. अशा काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षण घेऊन स्त्रियांना चूल आणि मूल या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने बाहेर काढण्याचे काम व त्याचबरोबर स्त्रियांना समाज प्रवाहामध्ये सामील करून घेण्याचे महत्त्वाचे काम केले. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी एकाच वेळी अनेक भूमिका वठविलेल्या आहेत; हे देखील त्यांनी विस्ताराने सांगितले. शिक्षणाबरोबरच त्यांनी व्यसनमुक्ती, त्याचबरोबर कर्जबाजारी उद्योग व्यवसाय कशा प्रकारे करावे, याबद्दल सावित्रीबाईंचे विचार सांगितले. ‘थांबला तो संपला’ हा मोलाचा सावित्रीबाईचा संदेश होता. त्याचबरोबर सावित्रीच्या लेकी म्हणून घेणे हे तितकेही सोपे नाही; त्यासाठी आपल्यालाही मोठे कष्ट करावे लागणार. स्त्रिया आपल्या दुःखाचे प्रदर्शन कधीच करित नसतात. सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याचाही आढावा त्यांनी घेतला.
महात्मा फुल्यांनी १९ व्या शतकामध्ये स्त्री-पुरुष समानता कशाप्रमाणे जोपासली, याचीही अनेक उदाहरणे व्याख्यानामध्ये दिली.
प्रारंभी प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.राजश्री भोपाळे मॅडम यांनी केले.
अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी केला तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रा.प्रियंका शिशोदिया यांनी मानले.
कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ.श्रीराम हुलसुरे, डॉ.पदमाराणी राव, डॉ.मीरा फड, डॉ.दुर्राणी,डॉ.संगीता चाटी, डॉ.म्हस्के, प्रा.सोनाली वाकोडे, प्रा.भारती सुवर्णकार तसेच तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.