https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

तालूक्यातील शेतकरी भयभित.* *लंम्पि चर्मरोगामूळे हमदापूर येथील पशुधन दगावले

मानवत / प्रतिनिधी.

लंम्पि डिसिज या चर्मरोगाने गेली काही दिवस थैमान घातले होते. त्यामुळे पशु संवर्धन विभागाने अनेक जनावरांचे लशीकरण करण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु पुन्हा या चर्मरोगाने डोके वर काढले असून याचा बळी मानवत तालुक्यातील मौ. हमदापूर येथील शेतकरी शंकर काशिनाथ शिंदे यांच्या पशुधनाचा घेतला आहे. तालुक्यातील मौ. हमदापूर येथील शेतकरी शंकर काशिनाथ शिंदे यांच्या गायीचे वासरू आजारी होते त्यावर वैद्यकीय उपचार ही सुरु होते परंतु २३ जुलै रोजी पशुधनाचा शारीरावर अधिक गाठी निर्माण होऊन लंम्पि डिसिज आजाराने शेतकऱ्याचे पशुधन दगावले आहे यामुळे शेतकरी शंकर काशिनाथ शिंदे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच लंम्पी डिसिज आजारामुळे गावामधील आत्ता पर्यंत ०४ ते ०५ जनावराचे मृत्यू झाले असून या बाबत तात्काळ उपाय योजना करुन लशिकरण मोहीम राबवावी अशी मागणी येथील पशु पालकांतुन आणि शेतकऱ्यातुन केली जात आहे गेली अनेक दिवसापासून पशुधन आजारी होते याची माहिती संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवली असता टाळा टाळ करत हलगर्जी पणा केला. असल्यामुळे हे पशुधन दगावले असल्याचे शेतकरी शंकर काशिनाथ शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704