स्वारातीम विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

नांदेड, दि. २१ जून २०२५, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी योगाचे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रा. रुद्रावती चव्हाण यांनीही योगाभ्यासाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना नियमित योगाची सवय लावण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. एम. के. पाटील, मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे , प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ. भालचंद्र पराग, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. पराग खडके, डॉ. डी एम नेटके, डॉ. वैजयंता पाटील, अभियंता तानाजी हुस्सेकर तसेच विद्यापीठ संकुलातील सर्व संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील कार्यक्रम क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मलिकार्जुन करजगी तसेच श्री. संजयसिंह ठाकूर, श्री. राम कीरकन, श्री. शिवाजी हंबर्डे, श्री. संभा कांबळे, श्री. बालाजी शिंदे आणि श्री. रतनसिंह पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले, तर क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांनी उपस्थितांचे आभार मानत योग दिनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.