https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमेचे मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उदघाटन

शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी < _______________________________________

मानवत / प्रतिनिधी.

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यां पर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम १५ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. मोहिमे अंतर्गत केंद्र शासनाच्या योज नांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्या तील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्याच्या माध्य मातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. याच अनुषंगाने १५ जानेवारी रोजी हा मोहीम कार्यक्रम मानवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला. ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधान मंत्री पोषण अभियान, हर घर जल – जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या ग्रामीण भागातील १७ योजनां सह शहरी भागातील नगर पालिका क्षेत्रात पी. एम. स्वनिधी योजना, पी.एम. आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्य मान कार्ड शिबीर, उज्ज्वला योजना आरोग्य तपासणी शिबीर, आधार अपडेट, पी. एम. मुद्रा लोन योजना बाबत माहिती देण्यात आली. कार्यक्र माचे प्रास्ताविक श्रीमती. कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी केले आपल्या प्रस्ताविकामध्ये केंद्र व राज्य शासना च्या वेगवेगळ्या योजना नगरपरिषद मार्फत राबविल्या जातात तसेच त्याची अंमलबजावणी शंभर टक्के होण्यास आमचा प्रयत्न असतो असे सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन मानवत नगर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी श्रीमती. कोमल सावरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या कार्यक्रमास मानवतचे तहसीलदार तथा विकसित भारत संकल्प यात्राचे तालुकास्तरीय अध्यक्ष श्री. जीवन धारासुरकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या कार्यक्रमास मानवत तालुक्यातील वेगवेगळ्या कार्यालयाचे अधिकारी या मध्ये डी. आर. रणमाळे गटशिक्षणाधिकारी मानवत, मुकेश राठोड शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मानवत, बी. आर. नाईक मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानवत, डॉ. ललित कोकरे राष्ट्रीय बाल स्वस्थ अधिकारी मानवत, नारायण शिंदे विस्ताराधिकारी महिला व बालकल्याण विभाग मानवत, सुशील शिरसाट शाखा व्यवस्थापक बडोदा बँक मानवत, संग्राम झावरे फिल्ड ऑफिसर भारतीय स्टेट बँक मानवत यांचे सह शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा मानवतचे अतुल चव्हाण इत्यादी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत बिडवे यांनी केले. तसेच नगरपरिषद मानवतचे कर्मचारी नगर अभियंता सय्यद अन्वर, विनय आडसकर, कार्यलीयन अधीक्षक भगवान शिंदे, आर. बी. चव्हाण, भारत पवार, एस. एस. जोशी, मुंजासा खोडवे, एस.बी उन्हाळे, शितल सोळंके, वंदना इंगोले, दीपक सातभाई, संतोष खरात, राजेश शर्मा, मनमोहन बारहाते, नारायण व्यवहारे, भगवानराव बारटक्के, एस. एन. रुद्रवार, पी. आर. पवार, एस.एस काळे, नारायण काळे, मुंजाजी डोळसे, सचिन सोनवणे, यशपाल भदर्गे, रितेश भदर्गे, शेख वसीम, सय्यद जावेद, सुनील कीर्तने, संजय कुऱ्हाडे, दीपक भदर्गे, बाळू लाड, बळीराम दहे, अलीम अन्सारी, सुनिता वाडकर, संजय कुऱ्हाडे, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704